नागपूर : शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला समलैंगिक संबंध ठेवण्याची सवय होती. त्यासाठी त्याने घराच्या काही अंतरावर सुरु असलेल्या एका युवकाला घरी बोलावले. त्याला खाऊ-पिऊ घालून समलैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. वृद्धाने त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकाने त्याच्यावर चाकूने हल्ला करीत ठार केले. त्या युवकाला मध्यप्रदेशातील छिंदवाड्यातून नागपूर पोलिसांनी अटक केली.

 २६ फेब्रुवारीला कोराडी परिसरातील दुर्गानगर येथे राहणारे ६५ वर्षीय पापेंद्र यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली होती. संध्याकाळी पत्नी घरी आल्यानंतर घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला होता. हत्येचा कुठलाही पुरावा मिळाला नाही. आठवड्यापासून पोलीस विविध माध्यमातून या हत्याकांडाचा तपास करीत होते. आरोपी युवक हा पापेंद्र यांच्या घरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. पापेंद्र यांनी त्यांच्या घरासमोरील रस्ता दुरुस्त करण्यासाठी आरोपी युवकाशी संपर्क केला होता. २६ फेब्रुवारीला त्यांनी त्याला घरी फोन करून घरी बोलावले. तो घरी पोहोचताच मडावीने त्याला मॅगी बनवून खाऊ घातली. त्यानंतर त्याला समलैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, त्याने संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पापेंद्रने युवकासोबत बळजरीने अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो घाबरला. त्याने टेबलावर पडलेल्या चाकूने पापेंद्र पापेंद्रवर हल्ला करून हत्या केली आणि पळून गेला. गुन्हे शाखेच्या पथकाने मडावी यांच्या मोबाईलमधील फोन नंबरवरून आरोपी तरुणाला छिंदवाडा येथून ताब्यात घेतले. त्याला कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

असा झाला हत्याकांडाचा उलगडा

सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे आरोपी गवसत नव्हता. त्यामुळे कोराडी पोलीस हतबल झाले. पापेंद्र हा शासकीय सेवेत कार्यरत होता. त्या शासकीय कार्यालयात पोलीस कर्मचारी गेले. त्यांनी पापेंद्रविषयी माहिती काढली. त्यावेळी पापेंद्र हा समलैंगिक असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलवली. आजुबाजूला चौकशी केली असता एक बांधकाम मजूर हत्याकांडाच्या दिवसापासून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन मध्यप्रदेशातून अटक केली. त्याने समलैंगिक संबंधाला प्रतिसाद न दिल्यामुळे खून केल्याची कबुली दिली.

Story img Loader