लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: प्रवाशांना घेऊन जाणारी ‘बोलेरो’ पुलावरून कोसळल्याने एक वृद्ध महिला ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. तसेच तिघे किरकोळ जखमी झाले.

जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाटा नजीकच्या पुलावर आज शुक्रवारी ही दुर्घटना घडली. यात कलावती टेकाडे (वय ८५, राहणार कदमापूर, तालुका खामगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या शिवाय दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून तिघेजण किरकोळ जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.