संजय मोहिते

बुलढाणा: भावी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या पाच बाजार समित्यांची निवडणूक उद्या रविवारी होऊ घातली आहे. संचालकांच्या नव्वद जागासाठी शेकडो उमेदवार रिंगणात असले तरी या निवडणुका दिग्गज राजकीय, सहकार नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढती ठरल्या आहे.

रविवारी ( दि. ३०) घाटावरील लोणार, चिखली तर घाटाखालील शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा समित्यांसाठी मतदान होत आहे. खासदार प्रतापराव जाधव यांचा गड समजल्या मेहकर मतदारसंघातील लोणार समितीत त्यांनी आजवर वर्चस्व राखले आहे. मात्र बदलत्या राजकीय स्थितीमुळे काल पार पडलेल्या मेहकर समितीच्या निकालानी शिंदे गटाच्या या जिल्ह्यातील सर्वोच्च नेत्याला चिंतानास भाग पाडले. त्यांनी विजय मिळविला खरा पण एकजुटीने लढणाऱ्या आघाडीने त्यांची दमछाक करीत सहा जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांना लोणारसाठी नव्याने व्युव्हरचना करावी लागली. त्यामुळे लोणार बाजार समितीचा निकाल त्यांना कधी नव्हे तेवढा महत्वाचा ठरला आहे. त्यांना आव्हान देणारे ठाकरे गटाचे आशिष रहाटे यांचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे.

हेही वाचा >>>नागपूर : वादळी पावसामुळे विमानाच्या १ तास आकाशातच घिरट्या

मेहकरमध्ये ते ‘हार कर भी बाजीगर’ ठरल्याने लोणारमधील चांगली कामगिरी त्यांना आणखी मोठा करणारी ठरणार आहे. यामुळे खासदारांच्या अडचणी वाढणार आहे. हा धोका लक्षात घेता खासदार, आमदार संजय रायमूलकर व प्रमुख शिलेदारांनी लोणार मध्ये जातीने लक्ष घातले आहे. चिखलीत समितीची निवडणूक, भाजपच्या आक्रमक आमदार श्वेता महाले विरुद्ध माजी आमदार राहुल बोन्द्रे, ठाकरे गटाचे संपर्क प्रमूख नरेंद्र खेडेकर, अशी लढत ठरली आहे. बोन्द्रे यांना माजी आमदार हे संबोधन बदलायचे तर खेडेकरांना आगामी लोकसभा लढवायची आहे. त्यामुळे ‘होम-पीच’ होणारा पराभव नको आहे. त्यामुळे तिघा नेत्यानी सर्वस्व पणाला लावले आहे. मलकापूरचे काँग्रेस आमदार राजेश एकडे याना मलकापूर समितीमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांनी नांदुरा बाजार समितीचा गड राखण्यासाठी नव्याने नियोजन केले आहे. भाजपनेते माजी आमदार चैनसुख संचेती यांना काहीही करून नांदुरा समिती ताब्यात ठेवायची आहे.

हेही वाचा >>>यवतमाळ बाजार समितींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का; पालकमंत्री संजय राठोड व माजी मंत्री माणिकराव ठाकरे गृह मतदारसंघात ‘फेल’

माजीमंत्री कुटे यांची दुहेरी परीक्षा

दरम्यान भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ , आमदार संजय कुटे यांना दोन ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागले. जळगाव व शेगाव समिती त्यांच्या मतदारसंघात मोडते. त्यांच्या समक्ष जळगावात राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटील तर शेगावात सहकार नेते पांडूरंग पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. या तिन्ही नेत्यांसह ठाकरे गटाचे गजानन वाघ, दत्ता पाटील, वंचित आघाडीचे अरुण पारवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभा लढतीत आमदार कुटे यांना कडवी झुंज देणारे प्रसेनजीत पाटील यांच्यासाठी समितीची निवडणूक निर्णायक ठरणारी आहे.

Story img Loader