संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या (अधिसभा) निवडणुकीतून माघार घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवसापर्यंत ५४ जणांनी माघार घेतली आहे. तर अभ्यास मंडळातून (बोर्ड ऑफ स्टडिज्) २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, १६ जागांसाठी मतदान होणार आहे. बहुतांश उमेदवारांचा समाज माध्यमांवरच प्रचाराच कल दिसून आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पक्षी, प्राण्यांपासून ‘ड्रोन’द्वारे पिकांचे संरक्षण; तरुण अभियंत्याचे संशोधन  

सिनेटमध्ये १० प्राचार्य, १० शिक्षक, ८ विद्वत परिषद, १० पदव्युत्तर, १० संस्था चालकांचे प्रतिनिधी, १० पदवीधर नोंदणी, ४ महिला राखीव, १ राज्यपाल नामित, ३ विद्यापीठ प्रतिनिधी, सर्व परीक्षा मंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. यात काही उमेदवार बिनविरोध आले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून प्रचाराला वेग आला आहे. २२ नोव्हेंबरला मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाईल. या तिन्ही प्राधिकारिणींच्या निवडणुकीसाठी गेल्या २७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी २८ ऑक्टोबरला सर्व अर्जांची छाननी करुन त्यातील वैध व विधीग्राह्य नसलेल्या अर्जांची यादी घोषित करण्यात आली. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

हेही वाचा >>>‘बार्टी’च्या निविदा प्रक्रियेत त्रुटी ; गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप

दरम्यान, सिनेट आणि विद्वत परिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी पात्र उमेदवारच न भेटल्याने त्या दोन्ही जागा रिक्त राहणार असून दोन्ही प्राधिकारिणींमध्ये प्रत्येकी एक जागा बिनविरोध निवडली गेली आहे. अभ्यास मंडळातून २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने यावर्षी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख व डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्या नेतृत्वातील ‘नुटा’, प्रा. प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्वातील शिक्षण मंच आणि प्रा. कमलाकर पायस यांच्या नेतृत्वातील जस्टीस पॅनलसह बरेच अपक्ष यावेळी मैदानात आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : रेल्वे मार्गाच्या कामासाठी १५ गाड्या चार दिवस रद्द

दहा प्राचार्य, दहा पदवीधर विद्यार्थी, दहा प्राध्यापक, संस्थाचालकांचे सहा प्रतिनिधी आणि विद्यापीठातील तीन शिक्षक अशाप्रकारे सिनेटच्या ३९ तसेच प्रत्येक विद्याशाखेतील प्रत्येकी दोन यानुसार चार विद्याशाखांमधून विद्वत परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या ८ पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of senate members of sant gadgebaba amravati university will begin amy