वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारांचा निवडणूक खर्च निर्धारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये दैनिक, साप्ताहिके, अर्ध साप्ताहिक, वस्तुंचे दर, नगर पालिका व ग्रामीण क्षेत्रातील जाहिरात फलक, वाहने, बल्क एसएमएस तसेच स्थानिक केबलचे दर निश्चित करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रचार व प्रसिध्दीसाठी वापरण्यात येणाऱ्या बाबींचे ठराविक दर खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेले वस्तूंचे दर :
शामियाना पेंडाल प्रतिदिन प्रति स्के.फुट १३० रुपये, साधा पेंडाल प्रतिदिन प्रतिस्के.फुट ४ रुपये, लाकडी स्टेज प्रतिदिन प्रतिस्के. फुट २५० रुपये, कमान प्रतिदिवस प्रतिनग २५०० रुपये, ग्रीनमॅट १५ बाय ३० फुट १०० रुपये, बॅरीकेट ३ बाय ३ रनिंग फुट ५ रुपये, लाकडी पोडियम प्रतिदिवस २५० रुपये, व्हीआयपी खुर्ची प्रती युनिट ३० रुपये, स्पीकर बाँक्स, ॲम्पीफायर माईकसह प्रतीदिवस १५०० रुपये, भोंगे ॲम्पीफायर व माईकसह प्रतीदिवस १००० रुपये, माईक प्रतीदिवस ३० रुपये, एलसीडी टीव्ही प्रतिनग प्रतिदिवस ८०० रुपये, डीव्हीडी प्लेअर प्रतिनग प्रतिदिवस १२५० रुपये, पेडेस्टल फॅन प्रतिनग प्रतिदिवस ८० रुपये, जनरेटर २५ किलोवॅट प्रतिदिवस ३००० रुपये, जनरेटर ५० किलोवॅट प्रतिदिवस ४००० रुपये, जनरेटर १०० किलोवॅट प्रतिदिवस ५००० रुपये, एलईडी स्क्रिनसाठी वाहन प्रतीदिवस ३५०० रुपये, हॅलोजन व्हाईट फोकस ५०० वॅट प्रतीदिवस ५० रुपये, कुलर डेझर्ड जेम्बो प्रतिदिवस ८०० रुपये, सीसीटिव्ही कॅमेरा (४ कॅमेरा) प्रतीदिवस १०० रुपये, जेवण साधे प्रतिथाली १०० रुपये, मासाहारी जेवन प्रतिथाली १५० रुपये, नाश्ता प्रतीथाली ३५ रुपये, पोहा प्रतिप्लेट २५ रुपये, चहा प्रतीकप १० रुपये, कॉफी प्रतीकप २० रुपये, दुध प्रतीकप १५ रुपये, वॉटरकॅन २० लिटर प्रतीकॅन ३० रुपये, पाणी बॉटल एक लिटर प्रतिनग २० रुपये, पाणी पाऊच ५ रुपये नग, निवडणूक प्रतिनिधी प्रतीव्यक्ती मानधन ६०० रुपये, मतदान प्रतिनिधी प्रतिदिवस ७०० रुपये, घरपोच प्रचार मानधन प्रति व्यक्ती ६०० रुपये, १० बाय १० आकाराचे ऑफिस भाड्याने १० हजार रुपये, बँड, ढोल, ताशा ५ हजार.
फलक व होर्डिंचे दर :
स्वागत गेट मंडप परवाना शुल्क २०० रुपये तसेच जागाभाडे प्रतिदिन प्रती चौ.फुट २ रुपये, बोर्ड, बॅनर, पुलावरील व भिंतीवरील केलेल्या जाहिराती परवाना शुल्क २०० तसेच मनपाव्दारे निश्चित सार्वजनिक जागेवर, जागाभाडे प्रती चौ. फुट प्रतिदिन ३ रुपये, खाजगी जागेवर प्रती चौ.फुट प्रतीदिन १.५०रुपये.
स्थायी जाहिरात फलक, होर्डिंगचे दर :
खाजगी जागेवरील जाहिरात होर्डिंगसाठी प्रती चौ. फुट ३० रुपये, सार्वजनिक व शासकीय जागेवरील होर्डिंगकरिता प्रती चौ. फुट ६० रुपये तसेच नवीन नुतणीकरण (संस्करण फी) प्रती चौ. फुट १०००रुपये.
हेही वाचा…धुळवडीनंतरच प्रचारात रंग भरणार; अनेक मतदारसंघातील लढतीचे चित्र अस्पष्ट
जिल्हा माहिती कार्यालायाव्दारे तसेच केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत दैनिक, साप्ताहिक, टिव्ही चॅनल, रेडीओ यांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर निश्चित करण्यात आले.