निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे वेगळ्या विदर्भाचे आंदोलन उभे करण्यासाठी विदर्भीयांची मूठ बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते येत्या २० सप्टेंबरला नागपुरात प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. स्वतंत्र विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. परंतु, प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांचा निवडणुकीपुरता वापर केला.
हेही वाचा : ‘अग्निवीर’ भरतीसाठी विदर्भातून ६० हजार तरुण नागपुरात येणार
त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या राजकीय पक्षांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या पार्श्वभूमीवर काही विदर्भवाद्यांनी प्रशांत किशोर यांच्या संपर्क साधला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांची टीम विदर्भात आली. स्थानिक लोकांशी चर्चा केली आणि नंतर निवडक २० लोकांची ऑनलाईन बैठक प्रशांत किशोर यांनी ६ सप्टेंबरला घेतली होती. आता विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २०० लोकांची बैठक नागपुरात २० सप्टेंबरला प्रशांत किशोर घेणार आहेत.