लोकसत्ता टीम

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदानास अवघे सात दिवस शिल्लक आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार विविध शक्कल लढवत आहेत. यवतमाळातील एका अपक्ष उमदेवाराने तर स्वत: नाचत जनतेच्या पाया पडून (पदस्पर्श)आशीर्वाद मागण्याचा फंडा अवलंबला आहे.

army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
tejas Thackeray
माजी मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव चक्क सामान्‍यांच्‍या खुर्चीत! वलगावातील सभेत…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Abdul Sattar
Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”, मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानाचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Uddhav Thackeray On Amit Thackeray
Uddhav Thackeray : अमित ठाकरेंच्या विरोधात माहिममध्ये सभा घेणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आवश्यकता…”
Ramdas Athawale on Raj Thackeray
‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका

अमरदीप आनंद वानखडे हे तरूण अपक्ष उमेदवार म्हणून यवतमाळ विधानसभेची निवडणूक लढवित आहे. ‘चप्पल’ ही त्यांची निशाणी आहे. ते दररोज नवनवीन क्लुप्या काढत असतात. मतदारसंघात यवतमाळ शहरासह ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. प्रचार यंत्रणा असल्याशिवाय हा मतदारसंघ पिंजून काढणे शक्य होत नाही. अनेकदा पक्षाचे उमेदवारही संपूर्ण मतदारसंघ फिरू शकत नाही. अशावेळी ‘माऊथ पब्लिसिटी’ हाच पर्याय उमेदवारांसमोर असतो. काहीतरी नवीन फंडा अवलंबिल्याशिवाय अशी प्रसिद्धी मिळत नाही. हे हेरून अमरदिप वानखडे या उमेदवाराने तीनचाकी रिक्षावर स्वत:चे बॅनर लावून भोंग्याने स्वत:चा प्रचार सुरू केला.

आणखी वाचा-योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

सकाळीच घरून निघून प्रचार करायचा आणि नागरिकांना ‘चप्पल’ला मत देण्याची विनंती करायची, असा फंडा ते वापरत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अमरदीप रस्यारीवर प्रचारगाडी लावून नाचत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांच्या पाया पडून चपलेस हात लावून आशीर्वाद घेत असल्याचे दिसते. यावेळी काही तरूण त्यांना सोबत करत नाचत असल्याचे दिसते. तर काहीजण चप्पल या निशाणीवरून शेरेबाजीही करत आहेत. अमरदीपच्या व्हिडीओकडे नागरिक मनोरंजन म्हणून बघत आहेत.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात आठ उमेदवार विविध पक्षांचे तर १४ उमेदवार अपक्ष आहेत. यात महायुतीकडून भाजपचे मदन येरावार, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर, तिसरी आघाडी प्रहारचे बिपीन चौधरी, वंचितकडून नीरज वाघमारे, बसपाचे भाई अमन हे महत्वाचे उमेदवार आहेत. मात्र खरी लढत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशीच आहे. यवतमाळ मतदारसंघात आजपर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडणूक जिंकला नाही. नऊ वेळा काँग्रेसचा उमेदवार येथे विजयी झाला. फॉरवर्ड ब्लॉकचा चार वेळा, भाजपचा चार वेळा आणि जनता दलाचा उमेदवार एका निवडणुकीत विजयी झाला. त्यामुळे यावेळीसुद्धा अपक्ष उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे. परंतु, विविध मार्गाने प्रचार करून नागरिकांचे लक्ष वेधून अपक्ष उमेदवारही आपल्या नावाचा डंका मतदारसंघात पिटत असल्याचे चित्र आहे.