अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभागासाठी होणारी निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. या निवडणुकीत एकाच नावाचे दोन उमेदवार मैदानात असल्याने संभ्रमाचा संशयकल्लोळ समेवर पोहोचला आहे. राजकारण्यांनाही लाजवेल इतके सत्तेचे प्रयोग या कलावंतांच्या निवडणूक मंचावर होताना पाहून सर्वसामान्य मतदारांतूनही संताप व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाट्यपरिषदेसाठीची निवडणूक येत्या १६ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी नागपूर विभागातून दोन पॅनल मैदानात आहेत. यातले एक पॅनल नाट्यपरिषदेच्या मुख्य शाखेचे तर दुसरे नाट्यपरिषदेच्याच महानगर शाखेचे आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पॅनलमध्ये सलीम शेख नावाचे उमेदवार आहेत आणि यावरूनच सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुख्य शाखेच्या पॅनलिवरुद्ध दंड थोपटणारे परिवर्तन पॅनलचे सलीम फकिरा शेख यांनी या नामसाधर्म्याने निर्माण झालेल्या संशयकल्लोळाला मुख्य शाखेचे षडयंत्र संबोधले आहे. आम्ही अघोषित बंडखोर आहोत. प्रस्थापितांच्या मक्तेदारीविरुद्ध आम्ही जो बिगुल फुंकलाय त्याला नाट्यक्षेत्रातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रस्थापितांनी आमच्या पराभवासाठी समान नावाचा उमेदवार देऊन मतदारांना संभ्रमित करण्याची खेळी खेळली आहे. आता तर त्यांच्या नावाच्या पत्रकात माझे नाव घालण्यात आले आहे. सलीम नावाचा जो दुसरा उमेदवार आहे त्याचा नाटकाशी दुरान्वयेही संबंध नाही. त्याला आपल्या पॅनलमध्ये उमेदवारी देऊ असे सांगून अर्ज सादर करायला लावला व नंतर त्याला खड्यासारखा बाजूला करून त्याच्या उमेदवारीला अपक्षाचे स्वरूप दिले, असा गंभीर आरोपही सलीम फकिरा शेख यांनी केला.

हेही वाचा >>>नागपूर: ‘पैसे पाठव, नाहीतर बहिणीचे अपहरण करू…’

दोन पॅनल कोणते?

मुख्य शाखेच्या पॅनलमध्ये नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकसे व संजय रहाटे हे तिघे उमेदवार तर परिवर्तन पॅनलमध्ये कुणाल गडेकर, दिलीप देवरणकर व सलीम फकिरा शेख हे उमेदवार आहेत. सलीम मेहबूब शेख व दिलीप ठाणेकर हे दोन अपक्ष उमेदवार आहेत. एकूण १४०७ मतदार यातून तीन उमेदारांना निवडणार आहेत.

वरुडच्या मतदारांवर वरदहस्त कुणाचा?

हेही वाचा >>>नागपूर : महाराष्ट्रदिनाचा निषेध म्हणून उमरेड परिसरातून देशभरात जाणारा कोळसा रोखणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा

एकूण १४०७ मतदारांमध्ये सुमारे ७० मतदार वरुड येथील एका शाळेतील असल्याचे कळते. या मतदारांचे एकगठ्ठा मतदान होते. परंतु, त्यातही काहींचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे मतदार यादीत अजूनही असल्याचे कळते. यामागे कोण आहे, वरुडच्या मतदारांवर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने विचारला जात आहे.

मी खरा नाटकवाला आहे. नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत कुणी जर मतदारांना फसवत असेल तर ते याेग्य नाही. मतदार अशा फसवणुकीला सडेतोड उत्तर देतील, असा मला विश्वास आहे.- सलीम फकिरा शेख.

मला या राजकारणात पडायचे नाही. मी केवळ नरेश गडेकरांच्या म्हणण्यावर उमेदवारी अर्ज सादर केला होता. परंतु, वस्तुस्थिती समाेर आल्यावर मी थांबलो. अपक्ष म्हणून मी अद्याप कुणालाही मतदानासाठी साकडे घातलेले नाही.- सलीम मेहबूब शेख