अमरावती : वाढते प्रदूषण, इंधन दरामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात नव्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल ७ हजार ३४४ इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीची नोंद झाली आहे. दुसरीकडे, १०१ इलेक्ट्रिक कारची नोंदी नोंदणी झाली आहे. गेल्या काही वर्षात डिझेल, पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या इंधनाच्या दराने शंभरी गाठली आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांकडून इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा >>> वडील डॉक्टर, भाऊ वैमानिक, पण… मानसिक आजारी तरुण दोन वर्षांनी घरी कसा पोहचला पहा…
ग्राहकांची गरज ओळखून प्रतिष्ठित ब्रँडच्या वाहन निर्मिती कंपन्यांनीही विविध प्रकारातील आलिशान इलेक्ट्रिक कार बाजारात आणत आहेत. सध्या त्यांची किमती जास्त वाटत असली तरी इलेक्ट्रिक कार अथवा दुचाकी खरेदीवर शासनाकडून आधी आर्थिक सवलत दिला जात होती, त्यामुळे ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ओढा वाढला. राज्य सरकारने आता अनुदान कमी केले तरीही पेट्रोलच्या चढ्या दरांमुळे मागणी कायम आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही ई-वाहनांचा समावेश वाढला आहे.
हेही वाचा >>> राज्यात विजेची मागणी वाढली
गेल्या पाच वर्षांत ८३ ई-रिक्षांची खरेदी झाली आहे. पाच वर्षांत १५ हजार नव्या रिक्षा सरकारने परवाना धोरण खुले केल्याने रिक्षा परवाना घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात १ हजार ८४५ ऑटोरिक्षा प्रकारातील वाहनांची नोंदणी झाली. २०१९-२० या वर्षात १ हजार २४८ ऑटोरिक्षांची खरेदी झाली. २०२०-२१ मध्ये मात्र ऑटोरिक्षांची खरेदी मंदावली. या वर्षात केवळ १६८ ऑटोरिक्षांची नोंदणी होऊ शकली. २०२१-२२ मध्ये २६८ ऑटोरिक्षा खरेदी करण्यात आल्या. २०२२-२३ या वर्षात ६८८ ऑटोरिक्षांची नोंदणी झाली.