नागपूर : नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांत महावितरणने एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या सतरा महिन्यांत १० हजार ५७३ कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे. कृषी वीज धोरण २०२० डीडीएफ, नाॅन डीडीएफ आणि जिल्हा नियोजन निधीतून या जोडण्या देण्यात आल्या आहे.
आर्थिक वर्ष २०२२- २३ मध्ये नागपूर जिल्ह्यात ४ हजार ३३१ आणि वर्धा जिल्ह्यात ३ हजार ८६६ अश्या नागपूर परिमंडळात एकूण ८ हजार १९७ तर आर्थिक वर्ष २०२३- २४ च्या पहिल्या पाच महिन्यांत नागपूर जिल्ह्यातील १ हजार ३०३, वर्धा जिल्ह्यातील १ हजार ७३ आशा एकूण २ हजार ३७६ कृषीपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. १० हजार ५७३ कृषीपंपांपैकी सर्वाधिक ९ हजार ४०५ वीज जोडण्या या कृषी वीज धोरण- २०२० योजनेअंतर्गत असल्याची माहिती महावितरणचे नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
हेही वाचा – Dahi Handi 2023: दहीहंडी पावसातच फुटणार, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
कृषी वीज धोरण- २०२० अंतर्गत कृषी पंपाकरिता पायाभूत सुविधा उभारणीही केली जात आहे. त्यासाठी उपकेंद्रापासून ५ किमीच्या हद्दीत मिनी सोलर पार्क उभारण्याला व दुर्गम, डोंगराळ किंवा आदीवासी भागामध्ये कमी विद्युत दाबाच्या समस्या निवारण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणी, कृषी प्रवण उपकेंद्रामध्ये स्वयंचलित कॅपेसिटर बँक कार्यान्वित करणे, कृषी वाहिन्यांवर योग्य क्षमतेचे कॅपेसिटर बसविण्याची कामेदेखील प्रगतीपथावर असल्याचे दोडके यांनी सांगितले.