नागपूर: राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर गेली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून १० हजार मे.वॅ.हून अधिक वीज निर्मिती केली जात आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live: उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख ‘शिल्लक सेना’ करत देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “उद्धवजींना…!”

हेही वाचा… यवतमाळ: ‘एमडी ड्रग्ज’ची तस्करी, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी उन्हाळ्यात विजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘मिशन औष्णिक ८००० मेगावॅट’ चे उद्दिष्ट निश्चित केले होते. राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात विजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ती २८हजार मेगावॅटवर गेली. पुढच्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने सर्व संसाधनांचे नियोजन केले. १७ मे २०२३ रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १० हजार ७० मेगावाट वीज निर्मितीचा पल्ला गाठला. यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १० हजार १०२ मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक गाठला होता. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे विजेची वाढीव गरज भागवण्यास मदत होत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.