महेश बोकडे

नागपूर : मान्सून परतताच मुंबईतील विजेची मागणी साडेतीन हजार मेगावॅटहून जास्त तर राज्यातील विजेची मागणी २८ हजार मेगावॅटहून जास्त झाली आहे. सर्वाधिक वीजनिर्मिती महानिर्मितीच्या कोराडी आणि चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून होत असल्याचे चित्र आहे. पाऊस परतताच राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे सर्वत्र वातानुकूलित यंत्र, कृषीपंप, पंखे, विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी (१० ऑक्टोबर २०२३) दुपारी ३.२० वाजता राज्यात विजेची मागणी थेट २८ हजार २९७ मेगावॅटवर पोहचली. त्यापैकी ३ हजार ६६७ मेगावॅट मागणी मुंबईची होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दोन ते तीन आठवड्यापूर्वी मुंबईत विजेची मागणी ३ हजार मेगावॅटच्या जवळपास तर राज्यात २३ हजार मेगावॅटच्या जवळपास होती. राज्यात विजेची मागणी वाढल्यावर महानिर्मितीकडूनही वीजनिर्मिती वाढवली गेली आहे. त्यांच्या कोराडी प्रकल्पातून १ हजार ९२० मेगावॅट, चंद्रपूर प्रकल्पातून १ हजार ९५० मेगावॅट, नाशिक ३५९ मेगावॅट, खापरखेडा ९७५ मेगावॅट, पारस ३२३ मेगावॅट, परळी ५६६ मेगावॅट, भुसावळ १ हजार २ मेगावॅट अशी एकूण ७ हजार ६६२ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात होती.

हेही वाचा >>> “विजय वडेट्टीवार पक्षांतर करणार…”; भाजपचे आशिष देशमुख यांचा दावा

तर, जलविद्युत प्रकल्पातून ६६६ मेगावॅट, सौर प्रकल्पातून ५७ मेगावॅट आणि विविध खासगी प्रकल्पांकडून ८ हजार ६६१ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात असल्याचे स्टेट लोड डिस्पॅच केंद्राच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ९ हजार ३७७ मेगावॅट वीज मिळत होती. महावितरणकडून विजेजी मागणी मंगळवारी दुपारी ३.२० वाजता २२ हजार ८९५ मेगावॅट नोंदवली गेली. ही मागणी दोन-तीन आठवड्यापूर्वी घसरून १८ ते १९ हजार मेगावॅटदरम्यान होती. राज्यात विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरण आणि महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

खासगी वीज प्रकल्पातून उत्पादन (मेगावॅटमध्ये)

अदानी- ३,१७९

जिंदल- १,१२१

आयडियल- २५४

रतन इंडिया- १,३१४

एसडब्ल्यूपीडीएल- ३३८