नागपूर : राज्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झाल्याने विजेची मागणी आता आणखी कमी होऊ लागली आहे. २४ जूनच्या तुलनेत २७ जूनला विजेची मागणी आणखी एक हजार ‘मेगावॅट’ने कमी होऊन या वर्षातील निच्चांकी पातळीवर आली. मंगळवारी दुपारी ३ वाजता राज्यात विजेची मागणी केवळ २२ हजार २६२ ‘मेगावॅट’ होती. त्यापैकी ३ हजार ९० ‘मेगावॅट’ची मागणी मुंबईची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसामुळे तापमानात घट झाली असून वातानुकूलित उपकरणांचा वापर कमी झाला आहे. दुसरीकडे पावसामुळे कृषीपंपाचाही वापर बंद झाला आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी २२ हजार २६२ ‘मेगावॅट’वर आली आहे. त्यापैकी १४ हजार ३४१ ‘मेगावॅट’ निर्मिती राज्यात होत आहे. राज्यात २७ जूनला दुपारी ३ वाजता विजेची मागणी २२ हजार २६२ ‘मेगावॅट’ होती. त्यापैकी ३ हजार ९० ‘मेगावॅट’ची मागणी मुंबईत होती. २४ जूनला राज्यात २३ हजार २६५ ‘मेगावॅट’ इतकी मागणी होती. मुंबईत २ हजार ‘मेगावॅट’ होती. ७ जूनला दुपारी ३ वाजता २७ हजार ९६२ ‘मेगावॅट’ इतकी मागणी होती. या वर्षातील हा निच्चांक असल्याच्या वृत्ताला महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी दुजोरा दिला.

सद्यस्थिती अशी…

राज्यात २७ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता विजेची मागणी २२ हजार २६२ ‘मेगावॅट’ होती. त्यापैकी राज्यात १४ हजार ३४१ ‘मेगावॅट’ची निर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ९० ‘मेगावॅट’ वीज मिळत होती, तर महानिर्मितीच्या औष्णिक, जलविद्युत, सौर, गॅस वीजनिर्मिती प्रकल्पातून ५ हजार ८५८ ‘मेगावॅट’ची निर्मिती होत होती. दरम्यान, अदानीकडून १ हजार ९१७, जिंदलकडून ७४४, आयडियलकडून १५६, रतन इंडियाकडून ९८९, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३४५ वीजनिर्मिती केली जात होती.