नागपूरः कोराडी परिसरात ‘झुरका’ चित्रपटाचे चित्रिकरण चोरीच्या वीजेवर होत असल्याचे चलचित्र समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारीद्वारा चित्रपट निर्मित होत असून ते अडचणीत येण्याची शक्यताही त्यात वर्तवली जात आहे. परंतु राजेश रंगारी यांनी सर्व आरोप फेटाळले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/zhurka-film-electricity-steal.mp4
व्हिडीओ सौजन्य- लोकसत्ता टीम

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे घर असलेल्या कोराडी परिसरात हल्ली झुरका या चित्रपटाचे चित्रिकरण नागरिकांच्या चर्चेचा विषय आहे. गेल्या आठवड्याभरापासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. चित्रपटाची निर्मिती महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारीद्वारा होत असून त्यात वीज चोही होत असल्याचे चलचित्र व संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यात एका पथदीव्यातून अनधिकृत जोडणी घेऊन चित्रपटाचे मोठ- मोठे फोकस लाईट, इलेक्ट्रिकशी संबंधित यंत्रही चालवले जात असल्याचा दावा करण्यात आला. हा प्रकार महावितरणच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली. यावेळी थेट वीज यंत्रणेतून जोडणी घेतली नसून पथदिव्याच्या मिटरमधून जोरणी घेतल्याचे पुढे आले. हा प्रकार अनधिकृत असल्याने वीज मिटर धारकाला सुमारे १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा… नवी अमरावतीहून पंढरपूरसाठी विशेष रेल्‍वेगाडी; पण फेऱ्या कमी

या विषयावर महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी म्हणाले, मा राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याने मला अडचणीत आणण्यासाठी खोटी पोस्ट व्हायरल केली केली. चित्रपटासाठी नगरपंचायतकडून अधिकृत परवानगीसह सगळ्या नियमांचे पालन होत आहे. परवा काही वेळ एक बॅट्री डाऊन झाल्याने ती चार्ज करण्यासाठी संबंधिताने १० ते १५ मिनटांसाठी पथदिव्यातील मिटरमधून वीज जोडून घेतली होती. हे कळल्यावर आम्हीच महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही वापरलेल्या वीजेच्या बदल्यास आवश्यक पैसेही भरले आहे. त्यामुळे चोरीचा आरोप चुकीचा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity stolen from koradi area nagpur for zhurka film mnb 82 dvr