नागपूर: महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील १३२ केव्हीचे ट्रान्सफार्मर बंद पडल्याने सोमवारी रात्री अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेकांची झोपमोड झाली उपराजधानीतील दक्षिण नागपूरमधील ताजबाग, मानेवाडा, श्रीकृष्ण नगर, अंबानगर, मंगलदीप नगर आणि त्याला लागून असलेल्या काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.तर हुडकेश्वर, भोलेनगर, गजानन नगर, सातपुते ले- आऊट, जानकी नगर, अमरनगर, आकाशनगर, अवधूत नगर, विहिरगाव, दिघोरी टोल नाका परिसर, न्यू सुभेदार ले- आऊट, बेसा, उदय नगर आणि इतरही भागात दीड तास वीज नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यामुळे बेसा परिसरात नागरिक संतापले होते. ते वीज कार्यालय परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला. दरम्यान महापारेषणचे १३२ केव्हीच्या ट्रान्सफार्मरच्या एवजी तेथे नवीन ट्रांसफार्मर बसवण्याचे काम आणखी काही दिवस चालणार आहे. त्यामुळे मागणी वाढताच एक- दोन दिवस वीज खंडित होण्याची शक्यता आहे. परंतु महावितणकडून वीज पुरवठ्यासाठी काळजी घेतली जात आहे. परंतु रात्रीच्या वेळी अचानक मागणी वाढत असल्याने नागरिकांनी वाता नुकुलीत यंत्राचा वापर कमी करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.