बुलढाणा : समृद्धी महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातातील ११ मृत प्रवाशांची ओळख पटली आहे. यामध्ये नागपूर येथील कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इशांत गुप्ता, गुडीया शेख यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातावर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक; शिंदे सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले, “वर्षभरात…”

याशिवाय वर्धा येथील अवंती पोहणकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृषाली बनकर, ओवी बनकर आणि शोभा बनकर यांचा समावेश आहे. येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या सहायता कक्षाच्या सूत्रांनी या नावाची पुष्टी केली आहे. नागपूरमधील आणखी एका युवकाचा मृतात समावेश असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रवाशी जळून खाक झाल्याने व ट्रॅव्हल्सकडे अपुऱ्या नोंदी असल्याने मृतांची ओळख पटविणे कठीण जात आहे.