बुलढाणा : शीर्षक वाचून कोणीही दचकणे स्वाभाविक आहे. तसेच आता अपघातासाठी प्रसिद्ध हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती महामार्गावर भुताटकी चा खेळ पान सुरु झाला काय? अशी मजेदार शंका मनात येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पण तस काही नसून ही अपघाताचीच बातमी आहे बरं का…रविवारी, नऊ मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चॅनेल क्रमांक ३३६.५ वर हा विचित्र अपघात घडला. यात लघु शंकेसाठी वाहनातून खाली उतरणे मजुराना महागात पडले. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय अक्षरशः पिरगाळला गेला आहे. इतरांना मुका मार लागला आहे.
लघुशंकेला थांबणे पडले महागात
टाटा ट्रक( एम एच २० जि झेड २८३०) चा चालक अमजद महमूद पठाण( वय 32 वर्ष राहणार पारोळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा वाहनात लहान सिमेंट मिक्सर टाकून ११ मजूरासह घेऊन जात होता. दरम्यान मध्यरात्री मंजूर लघुशंकेसाठी वाहनातून उतरले . याच वेळी अचानक मागील बाजूने भरधाव वेगाने आलेल्या ट्रक ( एम एच १५ एफव्हीओ ०९३७ )ने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली.
यावेळी लघवी करीत असलेल्या मजुरांपैकी शोएब शाह (वय विस वर्ष राहणार छत्रपती संभाजी नगर) हा गंभीर जखमी झाला झाला असून त्याचा पाय पिरगाळला गेला. त्याला समृद्धी महामार्ग रुग्णवाहीका मधून डॉक्टर यासीन शहा व चालक प्रवीण राठोड यांनी दवाखान्यात पाठविले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक उज्जैनकर व रात्रीच्या गस्त (पेट्रोलिंग ) वरील पोलीस यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. गंभीर जखमी शोएब शहा याच्या पायाचा चुराडा झाल्याने त्यास संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.