मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील ११ पर्यटक वाहने सफारीसाठी बंद करण्यात आली असून २३ वाहनांना इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने या पर्यटक वाहनांची तपासणी करुन अहवाल दिल्यानंतरही त्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, लोकसत्तात वृत्त प्रकाशित होताच व्यवस्थापनाला जाग आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेळघाट व्याघप्रकल्पात पर्यटक वाहनाच्या अपघाताचा आणि वाहन बंद पडल्याचा अनुभव पर्यटकांना आला. मेळघाट व्यवस्थापनाकडे याची तक्रार केली. त्यानंतर परिवहन विभागाकडून ही वाहने तपासली. अहवाल येऊनही कोणतीही कारवाई झाली नव्हती. लोकसत्ताने २४ डिसेंबरलाया संदर्भात वृत प्रकाशित केले ‘ त्यानंतर मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला जाग आली. सफारीसाठी असणारी सर्व वाहने परिवहनेत्तर संवर्गातील असून जंगल सफारीसाठी त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याने सहा जानेवारी २०२३ पर्यंत ती परिवहन संवर्गात करण्यात यावी.

हेही वाचा: ‘मास्क रिटर्न’ ! मुखपट्टी बंधनकारक, कुणासाठी जाणून घ्या…

अन्यथा वैराट सफारीकरिता ती बंद करण्यात येईल, असा इशारा चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने वाहन मालकांना दिला आहे. ११ वाहनांचे दस्ताऐवज योग्य नसून ती वाहने तांत्रिकदृष्ट्या देखील योग्य नाही. त्यामुळे ही वाहने पर्यटनासाठी बंद करण्यात आली आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी तसेच वाहनांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्रासह १० जानेवारी २०२३ पर्यंत चिखलदरा वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती सादर करावी. त्यानंतरच पर्यटनासाठी या वाहनांना परवानगी देण्यात येईल, असाही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा:“फडणवीस, हेच का संघाचे संस्कार?” शिवसेनेचा सवाल; शिंदे गटालाही टोला लगावताना म्हणाले, “४० बोक्यांचा आनंद…”

तीन वाहने जंगल सफारीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. काही वाहने सरकारी अधिकारी व इतर कार्यालयाच्या नावावर आहेत. ती वाहने १० जानेवारी २०२३ पर्यंत वाहनचालक किंवा मालक यांनी स्वत:च्या नावावर करुन घ्यावी. त्यानंतरच या वाहनांना सफारीसाठी परवानगी देण्यात येईल, असे आदेश मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील चिखलदरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. एम.एस. भैलुमे यांनी काढले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eleven tourist vehicles in melghat tiger project closed for safari in nagpur rgc 76 tmb 01