अकोला: राखी निर्मिती व त्याच्या विक्रीतून दिव्यांगांसाठी रोजगार निर्मितीचा विशेष उपक्रम दिव्यांग सोशल फाउंडेशन व दिव्यज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविला. या माध्यमातून दिव्यांगांना स्वबळावर उत्पन्न प्राप्त होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात १० ते १६ ऑगस्ट दरम्यान दिव्यांगांसाठी राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. दिव्यांगांना शिक्षणासोबत रोजगार मिळण्याच्या दृष्टीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत दिव्यांगांकडून विविध आकर्षक राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा… वर्धा : निकामी बॉम्बमधील धातूचे तुकडे वेचताना शेतमजुराचा मृत्यू

राख्या दिव्यांग सोशल फाउंडेशनच्यावतीने शहरातील विविध शाळा, महाविद्यालय व बाजारपेठेत दालने लावून विकल्या जाणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने सुद्धा या राख्या भारताच्या विविध शहरात पाठवल्या जात आहेत. विदेशातून सुद्धा राख्यांना चांगली मागणी येत आहे. या राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment for the disabled through rakhi making in akola ppd 88 dvr
Show comments