गडचिरोली : अहेरी तालुक्यातील दामरंचा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या आशा नैनेरच्या घनदाट जंगल परिसरात बुधवार रात्रीपासून पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. चकमक परिसरात रात्रीपासून पाऊस पडत असल्याने गुरुवारी सकाळीच मोठ्याप्रमाणात पोलिस कुमक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली असून सकाळपासून पोलीस जवानांनी शोधमोहीम सुरूच केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका नक्षलवाद्यांचे शव घटनास्थळी आढळून आले असून आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत पूर्ण माहिती पुढे येईल असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.

Story img Loader