नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे अजनी रेल्वस्थानकावर प्रदर्शन लावण्यात आले आहे.  त्याचे उद्घाटन मंगळवारी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते  झाले. यावेळी कारागृह अधीक्षक अनुप कुमरे, धंतोलीच्या ठाणेदार प्रभावती एकुरके, सामाजिक कार्यकर्ते चंदूजी पेंडसे, विजय जथे उपस्थित होते. प्रदर्शनात कैद्यांनी तयार केलेल्या पणत्या, दिवे, आकाश कंदिल, मेनबत्या, टेबल, खुर्ची, चादरी, साड्या, सुबक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा >>> नागपूर: राज ठाकरेंचे आभार मानावे लागू नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; मनसेचे संदीप देशपांडे यांचा दावा

यावेळी राहुल पांडे म्हणाले की, कारागृहाने राबवलेला पुनर्वसन उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमांमुळे कैद्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो.  कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये विविध कला, कौशल्य असते. याचा वापर करून त्यांनी आकर्षक  वस्तू तयार केल्या आहेत. केंद्र सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. येथे ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करण्यात येणार आहे. नागपूरकरांनी या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन कारागृह प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा >>> अकोला: ब्रिटिशकालीन गांधीग्राम पुलाला तडे, देशातील पहिल्या सिमेंटच्या पुलावरून वाहतूक बंद

“कैद्यांमधील कलागुणांना वाव मिळावायासाठी कारागृह प्रशासन प्रयत्नशील आहे.त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू केले.उपक्रमामुळे कैद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते.”

– अनुप कुमरे (कारागृह अधीक्षक)

Story img Loader