लोकसत्ता टीम

नागपूर : अंबाझरी तलावाच्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे आयटीपार्क ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. त्यात पुन्हा खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे या मार्गावरून सुरक्षित घरी पोहोचणे, हे मोठेच आव्हान ठरत आहे. विशेष म्हणजे, महापलिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, बजाजनगर, प्रतापनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांना हप्ते पोहचत असल्यामुळे यापैकी एकाही विभागाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतच्या रस्त्यावर जवळपास शंभरावर खाद्यपदार्थांची दुकाने विनापरवानगी सुरू आहेत. पदपथावर खुर्च्या टाकून ग्राहकांना खाद्य पुरवले जात आहे. आधीच दुकानांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यात पुन्हा ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत. तसेच स्वामी विवेकानंद चौकातून अंबाझरी टी-पॉईंट चौकापर्यंतचा रस्ता बंद असल्यामुळे वाहनांची वर्दळ माटे चौकातून जास्त आहे. त्यात पुन्हा रस्त्यावर खाद्यपदार्थांची दुकाने पदपथावरच थाटल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. ‘लोकसत्ता’ने याआधी या समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने कारवाईचा नुसताच देखावा केला. परंतु, या कारवाईनंतर दोन तासांतच महापालिका आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून या रस्त्यावर पुन्हा दुकाने सुरू झाली.

आणखी वाचा-‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट… अखेर तारीख…

कारवाई दुपारी, अतिक्रमण रात्री

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतच्या पदपथावरील खाद्यपदार्थांची दुकाने सायंकाळी लागतात. वाहतूक कोंडीसुद्धा सायंकाळीच होते. मात्र, महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक दुपारी या रस्त्यावर कारवाई करण्यासाठी चकरा मारतात. यावरून महापालिका या प्रकरणात बनवाबनवी करीत असल्याची चर्चा आहे.

“पदपथावर खाद्यपदार्थांची वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल तर वाहतूक पोलीस निश्चितच कारवाई करतील.” -कल्पना बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.