देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : विशिष्ट विचारांचा प्रचार आणि व्यक्तींच्या नियुक्त्यांचा ध्यास धरलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनासाठी उभारण्यात आलेल्या ‘ग्रामगीता भवन’मध्ये अन्य विभागांचे अतिक्रम वाढत आहे. परिणामी, अध्यासनातून होणाऱ्या मानवता आणि राष्ट्रभावनेच्या प्रचार आणि प्रसारालाच जणू सुरुंग लावला जात आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासह राष्ट्रसंतांच्या विचाराचा आदर्श घ्यावा, त्याचा प्रसार करावा या उद्देशाने २००७ साली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ परिसरातील, मराठी विभागातून त्याचे कामकाज सुरू होते. पुढे २०१३ मध्ये राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा अभ्यास, साहित्यसंग्रह, विविध प्रकल्पकार्य व व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यासाठी विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये जवळपास १० हजाराच्या वर्गफूट जागेवर राज्य सरकार आणि विद्यापीठाच्या वतीने २५ कोटी रूपये खर्च करून ‘ग्रामगीता भवन’ची उभारणी करण्यात आली. मात्र, या सध्या ‘ग्रामगीता भवन’मध्ये अन्य विभागांनी अतिक्रमण केले असून ‘ग्रामगीता भवन’च्या मूळ उद्देशाला तडा देणे सुरू आहे. येथे तुकडोजी महाराज अध्यासनासाठी एक वर्गखोली, एक परिषद सभागृह आणि विभागप्रमुखांचे कक्ष इतकीच जागा देण्यात आली असून अन्य जागांवर ‘मल्टी फॅकल्टी कॉम्प्युटर सेंटर’, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कक्ष, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता यांनी अतिक्रमण केले आहे. सुरुवातीला येथे ‘रुसा’ला एक कक्ष देण्यात आले होते. मात्र, सध्या त्यांनी एका कक्षासह बाजूच्या चर्चासत्र सभागृहावरही कब्जा केला आहे. यासह ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. खडेकर यांना एक कक्ष देण्यात आले होते. आता विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे सहअधिष्ठाता म्हणून त्यांनी या कक्षावर ताबा मिळवला आहे. काही महिन्यांआधीच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता बनलेले डॉ. माहेश्वरी यांनीही येथील एका प्रशस्त कक्षावर ताबा मिळवला असून संपूर्ण ‘ग्रामगीता भवन’वर त्यांचे वर्चस्व असल्याची कुजबूज सुरू आहे. विशेष म्हणजे, काही बैठकांसाठी खुद्द कुलगुरू अधिष्ठात्यांच्या या कक्षात येत असल्याची माहिती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात त्यांच्याच अध्यासनासाठी उभारण्यात आलेल्या ‘ग्रामगीता भवन’वर अतिक्रमण करून महाजांच्या विचारांच्या प्रचार प्रसार करण्यात खोडा निर्माण केला जात आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांना संपर्क केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

अध्यासनातील अनेक उपक्रमही बंद

‘ग्रामगीता भवना’चे लोकार्पण झाल्यावर सुरुवातीला मराठी विभाग प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे व नंतर डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी या अध्यासनाचा अतिरिक्त प्रभार सांभाळला. तोवर येथे केवळ अध्यासनाशी संबंधी कार्यक्रमांनाच वाव होता. मात्र, मागील काही वर्षांत अन्य विभागांच्या अतिक्रमणासह येथील अनेक उपक्रमही बंद करण्यात आले आहेत.

कर्मचारी अडगळीच्या जागेत

या इमारतीमध्ये १४९५ वर्गफुटांचा परिषद सभागृह, १०२७ वर्गफुटांचे दुसरे परिषद सभागृह, ९७० वर्गफुटांचे ग्रंथालय, ७५४ वर्गफुट वाचन कक्ष, विभागप्रमुख व्याख्याते व कार्यालयीन कक्ष यांचा समावेश आहे. मात्र, अध्यासनासाठी केवळ एक वर्गखोली, विभागप्रमुखांचे कक्ष व एक परिषद सभागृह इतकीच जागा देण्यात आली आहे. सध्या कर्मचारी बसत असलेल्या एका सभागृहामध्ये नव्याने ‘कॅश काउंटर’ उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अध्यासनामधील कर्मचाऱ्यांनाही अडगळीच्या जागेत बसावे लागत आहे.