बुलढाणा : चार वर्षानंतर तालुक्यातील सैलानी येथील झिरा परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली आहे. वन विभागाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मंगळवार ( दि . ५) पासून ही कार्यवाही सुरू केली.वन विभागाच्या अखत्यारीतील झीरा परिसरात वन अधिकारी एस. ए. आंबेकर व रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या उपस्थितीत कारवाई हाती घेण्यात आली. वन कर्मचाऱ्यानी सैलानी परिसरातील अस्थायी झोपड्या व दुकानांचे अतिक्रमण काढली. कारवाई अंतर्गत परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे.सैलानीत वर्षभर येणाऱ्या हजारो भाविकांची व वाहनधारकांची अतिक्रमण मुळे मोठी अडचण होते.
दरम्यान चार वर्षांपूर्वी अतिक्रमण काढण्यात आल्यावर जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र परिसरात भाविकांनी झोपड्या बांधुन तर व्यावसायीकानी दुकाने थाटली होती. यामुळे कारवाई हाती घेण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायपूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.