नागपूर : जगातील अनेक देशांत तस्करीसाठी गेंडय़ांची शिकार केली जात असल्याने त्यांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. आफ्रिकन गेंडय़ांची कमी होणारी संख्या हा प्राणी नामशेष होण्याचा धोका दर्शवते. जगभरात गेल्या पाच वर्षांत १५०० गेंडय़ांची शिकार करून तस्करी करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा धोका अधोरेखित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दक्षिण आफ्रिकेसह जगभरात फक्त २३ हजार ४३२ आफ्रिकन गेंडे शिल्लक आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) अहवालानुसार आफ्रिकेने सुमारे २२,१३७ गेंडे संरक्षित केले. त्यात ६,१९५ काळे, तर १५,९४२ पांढऱ्या गेंडय़ांचा समावेश आहे.

‘आययूसीएन’च्या आफ्रिकन गेंडा तज्ज्ञांच्या चमूने गेंडय़ांच्या संख्येची अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आफ्रिकन गेंडय़ांना धोका दर्शवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २०१८ आणि २०२१ दरम्यान गंभीरपणे धोक्यात असलेल्या काळय़ा गेंडय़ांची संख्या वार्षिक तीन टक्क्यांप्रमाणे वाढली, मात्र पांढऱ्या गेंडय़ांची संख्या दरवर्षी सुमारे ३.१ टक्के दराने कमी होत आहे.

पांढऱ्या गेंडय़ांची घटणारी संख्या प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील संरक्षित भागांत रोखण्यात यश आले आहे. पनामा येथील १९व्या ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’च्या (कॉप१९) आधी वन्यजीवजंतू आणि वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनात (साइट्स) हे निष्कर्ष सादर करण्यात आले आहेत.

करोनानिर्बंध उठताच..

करोना संकटकाळात प्रवासावरील निर्बंधांमुळे गेंडय़ांच्या शिंगांच्या तस्करीत अडथळे निर्माण झाले होते. दक्षिण अफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, केनिया येथे शिकारीचे प्रमाण कमी होते. मात्र, निर्बंध उठले आणि पुन्हा गेंडय़ांच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष आहेत. विशेषत: २०२१मध्ये गेंडय़ांची मोठय़ा प्रमाणावर शिकार झाल्याचे निदर्शनास आले.

पाच वर्षांत दीड हजार बळी

जगभरात गेल्या पाच वर्षांत १५०० गेंडय़ांची शिकार करण्यात आल्याचा ‘आययूसीएन’ संस्थेचा अहवाल आहे. गेंडय़ांची शिकार प्रामुख्याने त्यांच्या शिंगांच्या तस्करीसाठी केली जाते.

१५८८ व्यक्तींना अटक

आफ्रिकन देशांमध्ये २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत २७०७ गेंडय़ांची शिकार करण्यात आली. याच कालावधीत गेंडय़ांच्या शिकारप्रकरणी १५८८ जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी ७५१ खटल्यांमध्ये ३०० जण दोषी आढळले.