नागपूर : निसर्ग संवर्धनासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘आययुसीएन’च्या लाल यादीत धोकाग्रस्त प्रजाती म्हणून नोंद असलेले लांब चोचीचे गिधाड सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशेष म्हणजे, ज्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून ते नाहीसे झाले, त्याच परिसरात ते सापडल्याने या भागात पुन्हा एकदा गिधाडांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – वर्धा : २४ देश आणि ३७ शिक्षक; भारतीय विवाह पद्धतीचा करणार अभ्यास

गोंदिया विभागातून एक व नागपूर विभागातून एक असे दोन लांब चोचीचे गिधाड तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी आणण्यात आले. ते पूर्ण वाढ झालेले नसून बऱ्याच दिवसात त्यांना खायला न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे प्राथमिक निदान त्यांच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकांनी केले.

उपचाराला ते प्रतिसाद देत असून लवकरच ते निसर्गात भरारी घेतील अशी अपेक्षा ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमूला आहे. गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच वर्षांपूर्वी ‘गिधाड पहाडी’ नावाची एक जागा होती. याठिकाणी मोठ्या संख्येने गिधाड आढळायचे. कालांतराने तेथून गिधाडे पूर्णपणे नाहीशी झाली आणि ‘गिधाड पहाडी’ नावापुरतीच राहिली. मात्र, त्याच परिसरातून गिधाड मिळाल्याने हा सकारात्मक संकेत समजला जात आहे.

हेही वाचा – अहो खरं आहे! इथे होतेय टोमॅटोची ९० रुपये किलोप्रमाणे विक्री, मराठा समाजाचा उपक्रम

आता केवळ पेंच व्याघ्रप्रकल्पात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तसेच गडचिरोली येथे ते काही संख्येने ते आढळून येतात. नामशेषाच्या मार्गावरील गिधाडे कुणाला आढळून आल्यास त्यांनी ०७१२-२५१५३०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी केले आहे.