महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एपिक-इंडियाच्या(एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट अँड युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो) सहकार्याने सुरू ‘स्टार रेटिंग’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील उद्योगांचे वायू उत्सर्जनासंदर्भातले तारांकन जाहीर करण्यात आले आहेत. यात बंद झालेल्या उद्योगांचेदेखील तारांकन नमूद करण्यात आल्याने मंडळाच्या या उपक्रमाला गालबोट लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रात २०१७ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. यात पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली जिल्ह्य़ातील उद्योगांचा समावेश आहे. त्याअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २६९ उद्योगांची पाहणी करण्यात आली. यातील सुमारे ११४ उद्योग सर्वाधिक प्रदूषण पसरवणाऱ्यांच्या यादीत दाखवण्यात आले असून त्यांना एक आणि दोन तारांकन देण्यात आले आहे. या उद्योगातील वायू उत्सर्जनाची मात्रा अधिक दाखवण्यात आली आहे. तर पाच तारांकनमध्ये राज्यातील ५८ उद्योग समाविष्ट असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ या उद्योगांमधील वायू उत्सर्जनाची मात्रा अतिशय कमी आहे. सर्वाधिक वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांची राज्यातील संख्या सुमारे साडेबारा हजार इतकी दाखवण्यात आली आहे. त्याचे तारांकन पुढील टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे. या उद्योगांमधील धुलीकणांचे नमुने गोळा करुन त्याचे विश्लेषण करण्याकरिता शिकागो येथील एनर्जी पॉलिसी रिसर्च इन्स्टिटय़ुट, येल विद्यपीठ तसेच अब्दुल जमील लतीफ पॉव्हर्टी कृती प्रयोगशाळा यांना नियुक्त करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने वीज, सिमेंट, लोखंड, रसायन, कागदासह इतर आठ क्षेत्रातील उद्योगांची प्राधान्याने पाहणी करुन त्यांना रेटिंग दिले जाते. गेल्या वर्षी दहापेक्षा कमी उद्योगांनी यात सहभाग घेतला होता. आता ४८ उद्योगांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वाधिक प्रदूषित उद्योगांमध्ये एक तारांकन असणाऱ्या चंद्रपूर दोन उद्योगांचा समावेश आहे. मात्र, हे दोन्ही उद्योग अनुक्रमे २०१४ आणि २०१५ पासून बंद झालेले आहेत. त्यामुळे बंद असलेल्या उद्योगांना कशाच्या आधारावर या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले, हे कळायला मार्ग नाही. उर्वरित ४६ उद्योग देखील सुरू आहे का, यावर आता प्रश्नचिन्ह आहे.

जाहीर केलेली ४८ उद्योगांची तारांकन यादी

  • पाच तारांकन – चंद्रपूर-पाच, नागपूर-बारा, अमरावती-एक
  • चार तारांकन – चंद्रपूर-तीन, नागपूर-पाच, अमरावती-दोन
  • तीन तारांकन – चंद्रपूर-एक, नागपूर-चार
  • दोन तारांकन – चंद्रपूर-एक, नागपूर-दहा
  • एक तारांकन – चंद्रपूर-दोन

स्टार रेटिंग कार्यक्रम म्हणजे काय?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्टार रेटिंग कार्यक्रमात सुमारे २० हजार औद्योगिक वायू उत्सर्जनाच्या नमुन्यांची माहितीसहज उपलब्ध होते. याअंतर्गत औद्योगिक संस्थांना त्यांच्या औद्योगिक वायू उत्सर्जनाच्या प्रमाणावरुन एक ते पाच तारांकन देण्यात आले आहे. एक तारांकन प्राप्त औद्योगिक संस्था ही सर्वाधिक प्रदूषित तर पाच तारांकन प्राप्त संस्था ही सर्वात कमी प्रदूषित संस्था असते. औद्योगिक संस्था, शासन व सामान्य जनता मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या विभागातील औद्योगिक संस्थांचे तारांकन पाहू शकतात.

स्टार रेटिंग कार्यक्रमाची गरज का?

या कार्यक्रमामुळे पर्यावरण सुरक्षित राखण्यास तसेच पर्यावरणासंबंधी नियमांचे पालन करण्यास औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापकांना मदत होईल. यामुळे ते अधिक चांगले कार्यक्रम करण्यासाठी नवीन मार्ग शोधू शकतील. ज्या औद्योगिक संस्थांना पाच तारांकन प्राप्त आहेत, त्या इतर औद्योगिक संस्थांना पर्यावरणात उत्तम कामगिरी करण्यास भाग पाडतील. सर्वसामान्य लोकांनादेखील या औद्योगिक संस्थांचे कार्य आणि क्रियाशीलतेची माहिती सहज उपलब्ध होईल. औद्योगिक वायू उत्सर्जनाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. तसेच या संस्थांवर प्रदूषण कमी करण्यासंदर्भात त्या दबाव आणू शकतील.

ज्या पद्धतीने हा कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला, त्यावेळी पर्यावरणाचे काही भले होईल असे वाटले होते. त्यामुळेच या उपक्रमात आम्हीही सहभागी झालो. मात्र, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषित उद्योगांना हेतुपुरस्पर वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८च्या यादीमध्ये चार वर्षांपूर्वीची उद्योगाची स्थिती गृहीत धरण्यात आली आहे. यातील अनेक उद्योग हे चार-पाच वर्षांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. औष्णिक वीज केंद्रातून सर्वाधिक वायू प्रदूषण होते, पण याच उद्योगांना मंडळाने पाच तारांकन दिले आहे. मंडळाने तरी लोकांमध्ये गैरसमज पसरवू नयेत. त्यांच्या कारभारात पारदर्शकता आणावी. -प्रा. सुरेश चोपणे, सदस्य, विभागीय सशक्तीकरण समिती, केंद्रीय वने, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय.

‘स्टार रेटिंग’उपक्रमाअंतर्गत ज्या उद्योगांचे तारांकन जाहीर करण्यात आले, त्यात २०१२ पासूनच्या उद्योगांचा समावेश आहे. त्यातील काही उद्योग आता बंद झाले असतील. तसेच औष्णिक विद्युत केंद्राला पाच तारांकन दिले याचा अर्थ त्यांना प्रदूषणाच्या वर्गवारीतून बाहेर काढले असे नाही. त्यामुळे जाहीर झालेली यादी ही योग्य आहे.   – राहुल वानखेडे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर