नागपूर : तब्बल सहा वर्षांनंतर शहरातील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध भारत एकदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. द्विपक्षिय मालिकेतील पहिलाच सामना असल्यामुळे जवळपास दोन हजार कोटींपेक्षा जास्त रकमेवर सट्टेबाजी करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी देशभरातील मोठमोठे क्रिकेट बुकी सक्रिय झाले आहे.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा मैदानावर तब्बल ६ वर्षानंतर इंग्लंड विरुद्ध भारत असा एकदिवसीय क्रिकेट सामना गुरुवारी खेळण्यात येणार आहे. क्रिकेट सामना बघायला देशभरातून क्रिकेटप्रेमींना नागपूर गाठले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर कोट्यवधीची सट्टेबाजीचा खेळ करणारे क्रिकेट बुकीसुद्धा नागपुरात आले आहेत. अनेक मोठमोठ्या बुकींनी शहराच्या बाहेर हॉटेलमध्ये मुक्काम केला असून गुरुवारी सकाळपासूनच सक्रिय होणार आहेत. नागपूर पोलीस सतर्क झाले असून क्रिकेट सट्टेबाजी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी योजना आखत आहेत.

Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
India vs England 2nd T20 Highlights in Marathi
IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माचा विजयी चौकार! टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा
Sanju Samson Scored 22 Runs in an Over Against Gus Atkinson Hit 5 Boundaries Watch Video
IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा

२०२३ मध्ये आयोजित ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्यादरम्यान नागपर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी मैदानातील प्रेक्षक दिर्घेत सापळा रचून ‘लाईव्ह क्रिकेट मॅच’मधून जाऊन चार क्रिकेट सट्टेबाजांना अटक केली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने यावेळीही खबरदारी बाळगली आहे.

 या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा अशी नामांकित खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे या तिनही खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जुने क्रिकेट बुकी रडारवर

शहरातील आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले क्रिकेट सट्टेबाजा नागपूर पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेने क्रिकेट सट्टेबाजी खेळणाऱ्यांची यादी तयार केली असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच सायबर शाखेकडूनही क्रिकेट सट्टेबाजांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गुन्हे दाखल असलेल्या क्रिकेट सट्टेबाजांना पोलिसांनी सज्जड दम भरला असून त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येत आहे.

Also Read

तिकिटांचा काळाबाजार

क्रिकेट सामन्याची काही मिनिटांतच तिकिट विक्री झाल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. तिकिट न मिळाल्यामुळे अनेकांनी जास्त पैसे देऊन तिकिट घेण्यासाठी उत्सूकता दाखवली. त्याचा फायदा समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या युवकांनी घेतला. हजार रुपयांची तिकिट चक्क पाच हजार रुपयांपर्यंत विकण्यासाठी अनेकांनी फेसबुक, इंस्टाग्रामवर संदेश टाकले. काही युवकांनी जास्त पैसे घेऊन तिकिट देण्याचे आमिष दाखविल्यामुळे सायबर पोलिसांनी पाच जणांना नोटिस पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader