बुलढाणा: जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सुरू असलेल्या मतदानात संमिश्र मतदानाचा ‘ट्रेंड’ दिसून येत आहे. मलकापूर व मेहकर मध्ये मतदानाने ‘फिफ्टी’ चा आकडा पार केला असताना उर्वरित तीन ठिकाणी मात्र मतदारांची उदासीनता दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानाला मंदगतीने सुरुवात झाली. पहिल्या तासात अल्प मतदान झाले. सकाळी ८ ते १० दरम्यान मलकापूर (२४.४९ टक्के) व मेहकर ( १८.४६) वगळता देऊळगाव राजा( ८.६१) , बुलढाणा( ११.९८) , खामगाव( १५.८२) बाजार समित्यात जेमतेम मतदानाची नोंद झाली.

हेही वाचा… चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक ठार

दुसऱ्या टप्पात १० ते १२ वाजे दरम्यान मतदानाची गती वाढली. बारा वाजेपर्यंत मलकापूर ची टक्केवारी ६४.३६, मेहकर ५१.१६ तर खामगाव ४२.११ अशी समाधानकारक होती. मात्र बुलढाणा ३७.३३, देऊळगाव राजा २४ मधील मतदानाची गती मंदच राहिली. दुपारी बारा वाजेपर्यंत पाच समित्यात एकूण ९०९७ पैकी ४१४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiastic votes in malkapur mehkar voter discouragement in three places in buldhana scm 61 dvr
Show comments