महेश बोकडे

नागपूर : कोराडीत प्रस्तावित महानिर्मितीच्या नवीन प्रकल्पाला जनसुनावणीत पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला. परंतु महानिर्मितीसह ऊर्जा खात्याने प्रकल्पाच्या बाजूने मत नोंदवले. या प्रकल्पाचा निर्णय अद्याप व्हायचा असतानाच १९ जुलैला खापरखेडातील राख बंधारा फुटला. त्यामुळे पर्यावरणवादी पुन्हा संतप्त झाले असून त्यांनी कोराडीतील नवीन प्रकल्पाला विरोध केला आहे.

electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा
air pollution mumbai Constructions
बोरिवली, भायखळ्यातील बांधकामे निर्बंधमुक्त, गोवंडी शिवाजीनगर निरीक्षणाखाली; वायू प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांवर नजर
Why is desulfurization mandatory to reduce air pollution in thermal power plants and how much will it increase electricity prices
विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
electricity price increase by 40 paise per unit
वीजदरवाढीची टांगती तलवार, प्रतियुनिट ४० पैसे वाढण्याची भीती; केंद्र सरकारकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न
BMC issues stop work notice to 78 sra projects construction sites violating air pollution guidelines
प्रदूषण करणाऱ्या दोनशेहून अधिक झोपु प्रकल्पांना नोटिसा; उल्लंघन सुरू राहिल्यास बांधकामांना स्थगिती

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचा राख बंधारा गेल्यावर्षी जुलैमध्ये फुटला होता. त्यानंतर येथील राखमिश्रित पाणी परिसरातील शेतांसह जवळच्या नदीतून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले. आता पुन्हा १९ जुलै २०२३ रोजी पावसामुळे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा राख बंधारा फुटून राखमिश्रित पाणी परिसरातील शेतीत शिरले.

हेही वाचा >>>बुलढाणा: जैन समाजाचा चिखलीत मूक मोर्चा

खापरखेडा राख बंधाऱ्यातील पाणी कन्हान नदीत शिरल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. परंतु फिल्टर लावल्याने राख नदीत गेली नसल्याचा दावा महानिर्मिती करीत आहे. कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील राखेत किरणोत्सर्गाचे प्रमाण आढळल्याने या घटनांमुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वारंवार हे बंधारे फुटण्याला येथील निकृष्ट कामासह निकषानुसार एकाही बंधाऱ्याचे काम न करणे, हे एक कारण असल्याचेही पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>कारधा पुलावर लागले कायमस्वरूपी बॅरिकेटस्; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

पर्यावरणवाद्यांचे म्हणणे काय?

कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील राखेच्या बंधाऱ्यांमधून झिरपणारे राखमिश्रित पाणी सातत्याने परिसरातील शेतांसह नदीत जाते. बंधाऱ्यामुळे येथील भूजलाचेही पाणी प्रदूषित झाले आहे. सध्या महानिर्मिती सामाजिक दायित्व निधीतून आरओ लावून त्याचे पाणी नागरिकांना देते. महानिर्मितीकडून बंधाऱ्याबाबतचे निकषही पाळले जात नाहीत. त्यात पुन्हा नवीन प्रकल्प उभारून नागरिकांच्या जीवाशी खेळ योग्य नाही, असे मत सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलेपमेंटच्या संस्थापक लीना बुद्धे यांनी व्यक्त केले. सुधीर पालीवाल म्हणाले, केंद्राच्या धोरणानुसार औष्णिक विद्युत प्रकल्पातील नवीन तयार होणाऱ्या राखेसह जुनी राख संपवण्याची जबाबदारी महानिर्मितीची आहे. परंतु ते होत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही काही करत नाही. नवीन प्रकल्प झाल्यास नागपूरसह विदर्भातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हा प्रकल्पच नको.

Story img Loader