नागपूर : राज्यात पावसाचा जोर वाढताच जलजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. २०२३ मध्ये राज्याच्या विविध भागात जलजन्य आजाराची १९ वेळा साथ आली. परंतु, यंदा १ जानेवारी ते १४ जुलै २०२४ दरम्यान २६ साथींची नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढल्यावर दूषित पाणी, दूषित अन्न किंवा पेये, संक्रमित प्राणी अथवा मानव किंवा त्यांच्या वातावरणाच्या संपर्कातून होणाऱ्या विविध जलजन्य आजाराने रुग्ण वाढले आहे. रुग्णांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळच्या रुग्णांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात २०२३ मध्ये जलजन्य आजाराचे १ हजार २१३ रुग्ण नोंदवण्यात आले होते. तसेच १ जानेवारी ते १४ जुलै २०२४ दरम्यानच्या साडेसहा महिन्यांच्या काळात १ हजार २१२ रुग्ण नोंदवले गेले. २०२४ मध्ये सर्वाधिक काळ कावीळची साथ होती. त्यात ३७० रुग्ण आढळले. अतिसारचे ६२७ रुग्ण, कॉलराचे २०१ रुग्ण, गॅस्ट्रोचे १४ रुग्ण नोंदवले गेले. कावीळचा एक मृत्यू वगळता इतर आजाराच्या रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.

आणखी वाचा-गोंदिया: “भाजपने मला मूर्ख बनवलं” माजी आमदाराचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

साथरोग नियंत्रणासाठी औषधांचा व इतर साहित्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरोघरी सर्वेक्षण, जनजागृती, उपचारामुळे स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनीही आजार टाळण्यासाठी घर- परिसरात स्वच्छता ठेवणे, पाणी उकळल्यावर थंड करून पिणे, आजार कळताच जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे आहे. -डॉ. कैलाश बाविस्कर, उपसंचालक, माहिती जनसंपर्क, आरोग्य विभाग, पुणे.

आरोग्य विभागाने केलेले प्रतिबंधात्मक उपाय

पावसाळ्यात पाणी पुरवठ्याच्या पाईपमधील गळत्या शोधणे व दुरूस्ती करणेबाबतच्या सुचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची जिल्हा, राज्य आरोग्य प्रयोगशाळांमार्फत नियमित तपासणी करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत सनियंत्रण करण्यात येत आहे. गावपातळीवर जलसुरक्षाकांचे पुर्न:प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोतांची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्याचेही आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे. सोबत सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरणाच्याही सूचना दिल्या गेल्या आहे.

आणखी वाचा-“आरक्षण युद्ध सरकार पुरस्कृत…” काँग्रेस नेत्यांच्या टीकेने नवीन चर्चा

०२

आजारसाथरुग्णसंख्यामृत्यू
कॉलरा०२०५ ०१
गॅस्ट्रो००००००
अतिसार१५१,१८५००
कावीळ०२२३००
विषमज्वर००००००
एकूण१९१,२१३ ०१

जलजन्य आजाराची स्थिती (१४ जुलै २०२४ पर्यंत)

आजार साथरुग्णसंख्यामृत्यू
कॉलरा ०७ २०१००
गॅस्ट्रो ०११४००
अतिसार ०७ ६२७००
कावीळ ११ ३७००१
विषमज्वर ००००००
एकूण २६१,२१२०१
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epidemic of waterborne diseases in the state mnb 82 mrj
Show comments