नागपूर: राज्याच्या बऱ्याच भागात सातत्याने कमी- अधिक पाऊस पडत आहे. त्यायातून साचलेल्या पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी पिल्याने जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार व जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. साथीचे आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. तर दूषित पाण्याच्या संपर्कातून विषमज्वराची लागण होऊ शकते. या रुग्णामध्ये सुरवातीला हलका ताप असतो. नंतर तो वाढतो. पोटात वेदना असतात. डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येतो, अशक्त वाटते, भूक कमी होते. काही रुग्णांना छाती व पोटावर चपटे गुलाबी रंगाच्या ठिपक्यांचे पुरळ उठतात. आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नये, घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवावी.

हेही वाचा… भंडारा जिल्हावासीयांना भुरळ घालणारं एक ‘भुताचे झाड’; जाणून घ्या…

साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लहान मुले, गरोदर माता, वृद्ध, सहआजार असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी. स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. एकही आजाराची लक्षणे असल्यास जवळच्या शासकीय वा खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epidemic risk due to stagnant rain water mnb 82 dvr
Show comments