वर्धा : राज्यभर आंदोलन करणाऱ्या नर्सेस संघटनेने आता निर्वाणीचा इशारा राज्य शासनास दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची ही संघटना आहे.
आयटक सलग्न कंत्राटी नर्सेस युनियन राज्य समितीने विविध आंदोलने करीत लक्ष वेधल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी समस्या सोडविण्याची हमी दिली होती. मात्र उत्तर मिळाले नाही, असे राज्य सरचिटणीस संगीता रेवडे यांनी नमूद केले. म्हणून राज्यव्यापी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा – नागपूर : भरधाव ट्रकची ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीला धडक; तिघे ठार
आताही शासनाने त्वरित दखल न घेतल्यास एक ते पंधरा जूनपर्यंत काळी फित लावून निषेध आंदोलन करू. त्यानंतर सतरा जूनपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
हेही वाचा – नागपूर : अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू; रिक्त जागांसह नोंदणीबाबत जाणून घ्या सविस्तर
समान कामाला समान वेतन अशी मुख्य मागणी आहे. संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना भेटून समस्या मांडल्या. मनोहर पचारे, सुरेश गोसावी, ज्योती भारती, सारिका किरडे, ललिता वाघ, ज्योती मून यांनी मार्गदर्शन केले.