नागपूर : शहराला एज्युकेशन हब म्हणून स्थापित करण्यासाठी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ इकॉनामिक कौन्सिलने (वेद) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – महाराष्ट्रात अंतर्गत रेल्वे नेटवर्कबाबत उदासीनता; गुजरातसह इतर राज्यांत जाण्यासाठी मात्र अनेक गाड्या

हेही वाचा – बुलढाणा : इकबाल चौकात अतिक्रमण हटाव मोहीम; चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासनाला जाग

वेदच्या निवेदनानुसार, या विद्यापीठात उच्च व्यावसायिक सुरक्षा, पोलीस शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण दिले जाते. असे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मिहान हे योग्य स्थान आहे. मुंबईजवळ हे विद्यापीठ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे आम्हाला समजते, परंतु फडणवीस यांनी पुढाकार घेऊन नागपूरचा विचार करावा. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ हे गुजरातमधील गांधीनगर येथे स्थित केंद्रीय विद्यापीठ आणि महत्त्वाची संस्था आहे. २०२० मध्ये केंद्राने कायदा करून गुजरात सरकारकडून विद्यापीठ ताब्यात घेतले. या विद्यापीठाचे देशभर उपकेंद्र (कॅम्पस) स्थापन करण्याची योजना आहे. नागपुरात एक कॅम्पस स्थापन करावा, कारण हे शहर मध्यवर्ती स्थान असून संपूर्ण मध्य भारतीयांसाठी ते सोयीचे आणि फायदेशीर ठरेल, अशी मागणी वेदने केली आहे.