मंगेश राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळा पैसा आणि चलनातील बनावट नोटा संपवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशात नोटाबंदी केली होती. त्यानंतर नवीन नोटा निर्माण करण्यात आल्या. आता बनावट नोटा तयार करता येणार नाही, असा दावाही केला जात होता. पण, राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, बनावट नोटा तयार करणे व त्यांचे चलनात येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गेल्यावर्षीच्या तुलनेत बनावट नोटा बाळगणे, तयार करण्याच्या गुन्ह्य़ांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

बनावट नोटांचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असून दहशतवादी संघटना व या संघटनांना खतपाणी घालणाऱ्या देशांमध्ये भारतीय चलनाच्या बनावट नोटा तयार करण्याचे कारखाने असल्याचे बोलले जात होते. दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी चलन बदलल्यास बनावट नोट तयार करणे, अवघड जाईल, असा दावा करून केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी करीत असताना शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी एटीएम व बँकांसमोरच्या रांगेत उभे राहून आपले जीव गमावले. केंद्र सरकारने नवीन नोटा चलनात आणत असताना त्यात किती महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले व त्या किती सुरक्षित आहेत, हे पटवून दिले होते. लोकांनीही सरकारच्या भूमिकेवर विश्वास ठेवला. पण, नवीन नोटा चलनात येताच काही दिवसांनीच त्यांच्यासारख्याच बनावट नोटा बाजारात येऊ लागल्या. आता तर बनावट नोटा तयार करण्याचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

२०१९ मध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विविध सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवायांमधून बनावट नोटांची निर्मिती, त्या बाळगण्यासंबंधी दाखल गुन्ह्य़ांमध्ये ११.७ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. वर्षभरात २ लाख ८७ हजार ४०४ रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. २०१८ मध्ये १७ कोटी ९५ लाख ३६ हजार ९९२ रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हा आकडा सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईंमधून समोर आला असून प्रत्यक्षात बाजारात हजारो कोटी रुपये बनावट नोटांद्वारे चलनात असू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सर्वाधिक बनावट नोटा दोन हजारांच्या : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोटाबंदीनंतर देशात प्रथमच २ हजार रुपयांची नोट सुरू केली. पण, हीच नोट अर्थव्यवस्थेसाठी सर्वाधिक मारक ठरत असून बनावट नोटा तयार करणारेही दोन हजार रुपयाच्या नोटेलाच प्राधान्य देत आहेत. वर्षभरात जप्त करण्यात आलेल्या एकूण नोटांपैकी सर्वाधिक ९० हजार ५६६ नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत. नवीन पाचशेच्या नोटा ५२ हजार ८९३ आणि नवीन दोनशेच्या १७ हजार ४८६ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शंभराच्या नोटा ७१ हजार ८१७ असून त्या दोन हजार रुपयांच्या नोटांपेक्षा कमी आहेत, हे विशेष.