लोकसत्ता टीम

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १२० दिवस म्हणजे चार महिने उलटूनही बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., एम.ए. यासारख्या महत्त्वाच्या आणि अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या अभ्यासक्रमाचे अद्यापही निकाल लागलेले नाहीत. यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा मनस्ताप वाढला आहे.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र

करोनानंतर यावर्षीपासून शैक्षणिक सत्राला नियमित सुरुवात झाली. यात व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळेतच झाले. मात्र, असे असतानाही विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या. हिवाळी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा यंदा उशिरा घेण्यात आल्या. आता निकालालाही विलंब होत आहे. विद्यापीठाने ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करावा असा नियम आहे. मात्र, असे असतानाही बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., एम.ए. अशा विषयांचे निकाल १२० दिवस उलटूनही जाहीर झालेले नाहीत. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., या विषयांना सर्वाधिक विद्यार्थी असतात. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या निकालाकडे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असते. मात्र, तब्बल १२० दिवस उलटूनही विद्यापीठाने निकाल जाहीर केले नाही. दोन वर्षापासून विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालाची व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली दिसत आहे. मागील वर्षी सहा महिन्यांपर्यंत अनेक परीक्षांचे निकालच आले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड अडचण झाली. शेवटी हा विषय विधिमंडळामध्ये चर्चेला आल्यानंतरही खुद्द शिक्षण मंत्र्यांना याची दखल घ्यावी लागली होती. यंदाही परीक्षा होऊन चार महिने झाले असतानाही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाही. तर दीड वर्षापासून अनेक अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकाही मिळालेल्या नाही. त्यामुळे परीक्षा विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आणखी वाचा-‘ओटीपी-पासवर्ड’ दिला नाही, तरी गमावले सव्‍वा लाख रुपये

काय म्हणतात विद्यार्थी

एका विद्यार्थ्याने सांगितले की, नागपूर विद्यापीठातील बी.ए. प्रथम वर्षाची प्रथम सत्राची परीक्षा झाली व दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवून झाला. त्याचे सर्व आवश्यक प्रकल्पही पूर्ण केले. मात्र प्रथम सत्राचा निकाल अजूनही लागलेला नाही. आता द्वितीय सत्राची परीक्षाही होणार आहे. मात्र, असे असतानाही प्रथम सत्राचा निकाल जाहीर झाला नसेल तर आम्ही पुढील परीक्षेला सामोरे कसे जावे?

महाविद्यालयांकडून प्रक्रिया पूर्ण

बी.एस्सी. प्रथम सत्राचे पेपर तपासणी डिसेंबर २०२२ मध्ये झाली. निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाठवण्यात आला. आता मे महिना उजाळला. द्वितीय सत्राच्या परीक्षेचे अर्ज भरणेही सुरू झाले. परंतु प्रथम सत्राचा निकाल अद्याप लागलेला नाही. आम्हाला रोज विद्यार्थी विचारणा करतात. त्यामुळे प्रचंड अडचण येत आहे.