संजय मोहिते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: बातमीचे शीर्षक वाचून भाजपा कार्यकर्ते वगळता इतर सर्व गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. मात्र हे खरे आहे. अर्थात ही योजना केवळ एका दिवसापूरती म्हणजे आजच्या ‘संडे’ पुरतीच मर्यादित आहे बरं का…

कल्पक नियोजन व ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ बद्धल प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज १८ जूनला मध्यान्ही बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात राबविण्यात येत आहे. याचे टिफिन ( संवाद) बैठक असे मजेदार व समर्पक नामकरण करण्यात आले आहे. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघात आज रविवारी दुपारी भाजप आमदार व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अंगत पंगत जमली आहे. आपापल्या घरून आणलेला डब्यातील खाद्यपदार्थाचा सर्वजण आस्वाद घेणार आहे.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना खासगी बसवर दगडफेक; लूटमारीच्या प्रयत्न फसला

केवळ जेवणच नव्हे तर संवादही

दरम्यान या पंगतीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा, मार्गदर्शन, विचार विनिमय होणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. केंद्रातील नरेंद मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. सेवा, सुशासन व गरिब कल्याणाची ही ९ वर्षे असून ‘मोदी @ 9 ‘ अंतर्गत हा टिफिन संवाद आयोजित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्या पुरते सांगायचे झाल्यास खामगाव ( तलाव परिसर) , चिखली( श्रीराम नागरी पतसंस्था) व जळगाव जामोद येथे बैठक आहे.