नागपूर : घरात पाळणा हलणार असल्याची चाहूल लागल्यास प्रत्येक कुटुंबात आनंद संचारतो. घरात येणाऱ्या नवीन पाहूण्यासाठी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने तयारी केली जाते. बाळाच्या जन्मानंतर तो रडतो. रडण्याचा आवाज ऐकून अनेकांना आनंदाश्रू येतात. परंतु जन्मानंतर बाळ रडले नाही तर त्यामध्ये गंभीर समस्या संभावत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित महापेडिकॉन परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर पुढे म्हणाले, नागपूरसह जगभरात प्रत्येक लाख बालकांच्या जन्मादरम्यान शंभर बाळ रडत नाही. नवजात मुलाच्या मेंदूमध्ये प्राणवायूच्या कमतरतेमुळे बाळ जन्मतः रडत नाही. तसेच प्राणवायूची कमतरता, मुलाच्या तोंडात घाण पाणी शिरणे, कमी वजन असणे, अकाली जन्म होणे किंवा जन्मजात दोष असू शकतात. यामुळे अशा नवजात बालकांपैकी केवळ ३० ते ४० टक्क बाळ जिवंत राहतात. भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे येत्या काळात वर्षभरात ३ उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही डॉ. खळतकर म्हणाले.

हे ही वाचा…राज्य शासनाला सुप्रीम झटका, रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैधच…

नवजात मुलांमध्ये ‘ॲनिमिया’ ही समस्या सामान्य आहे, यामुळे बाळाच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या सामान्यपेक्षा कमी असते. बाळ अकाली ‘प्रीप्युअर’ झाले, लाल रक्तपेशी खूप लवकर तुटतात, शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी तयार होत नाहीत किंवा बाळाचे खूप रक्त कमी होते, अशा समस्यांवर मात करण्यासाठी संघटनेतर्फे रक्तक्षय निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी एक ‘मोबाईल व्हॅन’ तयार करण्यात येणार आहे. व्हॅनमध्ये एक बालरोग तज्ज्ञ, परिचारिका आणि तंत्रज्ञ असतील. पहिल्या टप्प्यात ४० ते ५० दुर्गम भाग असलेल्या गावातून १०० रक्तक्षयबाधित बाळांवर उपचार करण्यात येतील. यानंतर दुसरा उपक्रम सर्वांना अचानक गर्दी, मॉल तसेच रस्त्यावर अचानक कोलमडलेल्या एखादा जिवाला वाचवण्याची संधी सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळू शकते. त्यासाठी सीपीआर प्रशिक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी डॉ. उदय बोधनकर, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. पकंज अग्रवाल उपस्थित होते.

हे ही वाचा…१५०० रुपयांच्या योजनेसाठी २०० कोटीचा जाहिरात खर्च, काँग्रेसचा आरोप

रस्त्यावरची मुले वर्षभरासाठी दत्तक घेणार

बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे सुमारे ५० ठिकाणांवरील अनाथ बाळाच्या संस्थेतील मुले, रस्त्यावर सापडलेल्या मुलांना वर्षभर दत्तक घेतले जाणार आहे. त्याअंतर्गत बालरोग तज्ज्ञांची संख्या या मुलांच्या औषधोपचरापासून तर त्यांना आवश्यक पुस्तकांसह सर्व खर्च करणार असल्याची माहिती डॉ. खळतकर यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every hundred babies born worldwide 100 do not cry at birth due to oxygen deprivation mnb 82 sud 02