वर्धा : काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढण्यास उमेदवारच नाही म्हणून मित्रपक्ष टपून बसले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांना कामाला लागण्यास फर्मावले. ते फिरत पण आहे.

अशावेळी निष्ठावंत काँग्रेसी अस्वस्थ होत जागा सोडू नका म्हणून श्रेष्ठिकडे गाळ घालत आहे. पण वेळ निघून गेली असे उत्तर मिळत असतांनाच आता माजी आमदार अमर काळे यांनी लढण्याची तयारी दर्शवीत धक्का दिला आहे.

हेही वाचा…अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…

त्यांनी पूर्वी पासून नन्नाचा पाढा लावलं होता. पण पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणत ते पुढे आले आहे. ते म्हणतात की कोण लढणार हा भाग नंतरचा. वर्धेची जागा काँग्रेस कडेच राहावी, हा पहिला उद्देश आहे. त्यामुळे सक्षम उमेदवार नाही हा दावा काँग्रेसने खोडून काढत आहे. आम्ही दिल्लीत आमच्या भावना आज मांडणार, असे ते म्हणाले.

त्यांच्या सोबतच माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, किसान आघाडीचे शैलेश अग्रवाल, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांची नावे पुढे आली आहे. तसा फॅक्स गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आला. काळे यांनी लढण्याची तयारी दर्शविली. पण लढण्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने पक्षाने मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे ऐकायला मिळाले. काळे, शेंडे, अग्रवाल, चारूलता टोकस हे आज श्रेष्ठींची भेट घेणार असल्याची घडामोड आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादीने दिलेले हर्षवर्धन देशमुख यांची उमेदवारी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप व नरेश ठाकरे यांना अजिबात चालत नाही. अमरावतीच्या राजकारणात ते परस्पर विरोधात आहे. म्हणून जगताप व ठाकरे यांनी दिल्लीत गेलेल्या काळे शेंडेन्ना काँग्रेसीनेच ही जागा लढावी म्हणून पाठिंबा कळविला आहे.

हेही वाचा…नागपूर, रामटेक मतदारसंघांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत घोळ सुरूच

मात्र, ही अंतिम टप्प्यातील धावपळ यशस्वी ठरणार काय, याबाबत शंका व्यक्त होते. काँग्रेस पक्षानेच ही जागा लढावी म्हणून ज्येष्ठ नेते प्रवीण हिवरे यांनी रमेश चेन्नीथला यांना साकडे घातले होते. तेव्हा काँग्रेसकडे उमेदवार नाही म्हणून ही जागा मित्रपक्षांस सोडण्याचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले होते, असे हिवरे सांगतात. त्यामुळे आघाडीत काँग्रेस की मित्र कोण लढणार हा कळीचा प्रश्न ठरला आहे.

Story img Loader