नागपूर : लोकसेवा आयोगाच्या वतीने विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाच्या आधारित घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक गट- ब अराजपत्रित, निम्न श्रेणी लघुलेखक गट- ब, लघुटंकलेखक गट-क पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ डिसेंबर २०२२ ला या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. अनेक महिन्यांपासून उमेदवारांकडून या परीक्षेच्या निकालाची विचारणा केली जात होती. या परीक्षेला लाखो उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे अनेकांकडून वारंवार निकालासाठी विचारणा केली जात होती. एमपीएससीने चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून पात्र ठरलेल्या उमेदवारांची संगणक प्रणालीवर आधारित लघुलेखन टंकलेखनाची परीक्षा घेण्यात येणार आहे. लघुलेखक टंकलेखन चाचणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे कळवले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exam result announced by mpsc know what is the challenge ahead dag 87 ysh
Show comments