अकोला : शहरात दंगल उसळल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शहरातील केंद्रावर १५ मे रोजी होणाऱ्या दोन्ही शिफ्टमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये जिल्हाधिकारी यांचे पत्र क्रमांक कक्ष-२/गृह/प्र.स/कावि-२३१/२०२३ दिनांक १४ मे २०२३ अन्वये कलम १४४ लागू करण्यात आलेली आली. शहरातील चार पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू आहे.
या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शहरातील परीक्षा केंद्र क्रमांक २०१, २०५, २०६, २०७, २१०, २१२, २१४, २२१, २२५, २२९, २३१ वरील १५ मे रोजी नियोजित दोन्ही शिफ्टमध्ये होणाऱ्या विषयाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील परीक्षांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.