नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर कार्यालयाला करोना महामारीचा फटका बसला आहे. दोन निरीक्षकांसह चार लिपिक व इतरही कर्मचारी बाधित झाले आहेत. मुळातच कर्मचारी कमी, त्यात करोनामुळे
कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आल्या असताना आता कर्मचारी बाधित होत असल्याने याचा एकू णच कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. सध्या राज्यात टाळेबंदी असून मद्याची दुकाने बंद करण्यात आली आहेत. बारमधून विक्री सुरू आहे. यासंदर्भातील नियमांचे पालन होते किं वा नाही हे पाहण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे. तसेच अवैध मद्यविक्री रोखण्याचे कामही पोलिसांच्या मदतीने हा विभाग करतो. अशा काळात विभागातील पाच पैकी दोन निरीक्षकांना करोना झाला आहे. काही निरीक्षकांच्या कु टुंबातील सदस्य बाधित झाल्याने ते रजेवर गेले आहेत.
एकू ण सात लिपिकांपैकी चार लिपिक करोना बाधित आहेत. त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. मागच्या वर्षी करोनाच्या लाटेत या विभागाने दोन अधिकारी गमावले होते. त्याची धास्ती या विभागावर अजूनही आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेतही कर्मचारी बाधित होत असल्याने त्याचा एकू ण कामकाजावरच परिणाम होत आहे.