उपराजधानीतील युवकांमध्ये अधिक आकर्षण
महेश बोकडे, नागपूर</strong>
बदलत्या जीवनशैलीत व्यायमाचे महत्त्व सर्वानाच पटल्याने दैनंदिन व्यायम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या क्षेत्रातही वेगवेगळे बदल दिसून येत आहे. फिरताना-धावताना किती कॅलरीज खर्च होतात, हृदयाचे ठोके, चालण्याची गती, पावलांची संख्या याचेही मोजमाप आता इलेक्ट्रॉनिक ‘स्मार्ट हॅन्डवॉच’ द्वारे केले जात आहे. मात्र, डॉक्टरांचा सल्ला न घेता स्मार्ट वॉचचा वापर धोकादायक ठरू शकतो. कारण त्यातून निघणाऱ्या किरणांमुळे हृदयविकार संभवतो. याचा अनुभव काहींना आलाही आहे.
दैनंदिन व्यायाम करणाऱ्यांमध्ये हल्ली इलेक्ट्रॉनिक घडय़ाळ (स्मार्ट वॉच) वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: यात तरुण अधिक आहेत. इलेक्ट्रॉनिक घडय़ाळ वापरणाऱ्यांना त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार आणि क्षमता न बघता जास्तीत जास्त कॅलरीज खर्च व्हाव्या म्हणून अधिक व्यायाम केला जातो. खर्च झालेल्या कॅलरिजचे मोजमाप करण्यासाठी स्मार्ट वॉचचा वापर केला जातो. या घडय़ाळामधून निघणाऱ्या क्ष-किरणांमुळे हृदयविकारासह तत्सम आजार संभवतो. शहरातील
शासकीय आणि खासगी रुग्णालयांत हृदय, श्वसनासह इतर आजाराचे रुग्ण दाखल झाल्याची उदाहरणे आहेत. तपासणीअंती काहींनी स्मार्ट वॉच वापरल्याचे रुग्ण सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेने १४ देशांच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेल्या अभ्यासात स्मार्ट वॉच किंवा तत्सम इलेट्रॉनिक उपकरणातून निघणाऱ्या क्ष-किरणामुळे गंभीर आजार संभवतो, असा निष्कर्ष काढला होता. असे असले तरी स्मार्ट वॉच नियमित वापर करणाऱ्यांची मते वेगळी आहेत. या घडय़ाळामुळे व्यायामात शिस्त येते. किती चालावे, हृदयाचे ठोके किती असावे, याचे नियोजन करता येते. स्वत:ची क्षमता तपासता येते.
झोपेशी व्यायामाचा संबंध
निद्रारोग तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार झोप आणि व्यायामाचा थेट संबंध येतो. संबंधित व्यक्तीची रोज पूर्णवेळ झोप न झाल्यास व त्याने दुसऱ्या दिवशी जास्त व्यायाम केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परंतु स्मार्ट वॉच वापरणारे अनेक जण झोप पूर्ण न होता अलार्म वाजताच फिरणे, धावणे, सायकल चालवण्यासाठी निघतात.
प्रत्येक व्यक्तीची व्यायाम करण्याची वेगवेगळी क्षमता असते. प्रदूषण, घेत असलेला आहार, होणारी झोप याचा व्यायामाशी संबंध असतो. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न घेता इलेक्ट्रॉनिक स्मार्ट वॉच पाहून केला जाणारा व्यायाम आरोग्याला धोकादायक आहे. उपकरणातून निघणाऱ्या क्ष-किरणांचाही आरोग्यावर परिणाम शक्य आहे.
– प्रा. डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोगतज्ज्ञ, नागपूर