मेळघाटचा उल्लेख होताच डोळ्यासमोर येते ते कुपोषण, तेथील बालमृत्यू, आदिवासींचा जीवनसंघर्ष…पण, मेळघाटातील आदिवासींच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन दिल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचे प्रत्यक्ष दर्शन पुणे येथे नुकतेच घडले. नागपुरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने पुणे येथे आयोजित मेळघाट सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने मेळघाटातील संपन्न आदिवासी कलेचा, कलाकृतींचा आनंद पुणेकरांना घेता येत आहे.
हेही वाचा- अंधश्रद्धा निर्मूलनात शासनाचाच खोडा!
मेळघाटातील आदिवासींमधील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्यभर काम करणारे दिवंगत सुनील देशपांडे, त्यांच्या पत्नी निरूपमा देशपांडे यांच्या संपूर्ण बांबू केंद्राचे योगदान या निमित्ताने दिसून आले. ‘बदलते मेळघाट’ हे प्रदर्शन मेळघाटातील संपन्न कलेचा आणि पुण्यासारख्या शहरी भागाचा संपर्कसेतु बनण्याचे कार्य करीत आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. सुनील देशपांडे आणि डॉ. निरूपमा देशपांडे या दाम्पत्याने मेळघाटातील दुर्गम भागात २७ वर्षे उभे केलेले संपूर्ण बांबू केंद्राचे काम आणि त्यातून सहा हजारांहून अधिक कारागिरांना बांबूच्या कलाकृतीचे प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास प्रोत्साहित केले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मेळघाट सपोर्ट ग्रूपसारखे समूह पुण्यातच नव्हे, तर भारतात सर्वत्र कार्यरत व्हावेत, अशी अपेक्षा वंजारवाडकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- नागपूर : बाळासाहेब ठाकरे स्मृती केंद्राचा प्रस्ताव अजूनही कागदावरच
पुण्यातील खराडी भागातील ऍमेनोरा मॉलमध्ये संपूर्ण बांबू केंद्र, ऍमेनोरा यस फाउंडेशन आणि मेळघाट सपोर्ट ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन २२ ते २६ जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मेळघाटातील आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या बांबूच्या आणि अन्य कलाकृती, आदिवासींनी पिकवलेले रसायन विरहित विषमुक्त भरडधान्य, मध, हळद इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध असून हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.
उद्घाटनप्रसंगी विवेक कुलकर्णी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील निवासी वनवासी शाळा, ऍमनोरा टाऊनशिप मधल्या घरकाम करणाऱ्या महिलांचे पाणीबचाव प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी इत्यादी उपक्रमांची माहिती दिली.
हेही वाचा- “महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर अन्यायच केला”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप
कुपोषण आणि बालमृत्यूसाठी तीनदशकांपूर्वी बदनाम झालेल्या मेळघाटाचे बदलते सकारात्मक चित्र आणि संपूर्ण बांबू केंद्राच्या कार्याची माहिती संचालिका डॉ. निरुपमा देशपांडे यांनी दिली. ऍमनोरा यस फाऊंडेशनतर्फे अनिरुद्ध देशपांडे आणि मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे संतोष नखाते, दीपक जोशी, महेश डबीर, रसिका लिमये आणि उदयन पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर मेळघाट सपोर्ट ग्रुपच्या उपक्रमांची माहिती मिलिंद लिमये यांनी दिली.