लोकसत्ता टीम

यवतमाळ : पती-पत्नीच्या नात्यात निर्माण झालेला बेबनाव न्यायालयाच्या बाहेरच मिटवून देण्याच्या बहाण्याने तरूणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल सात वर्ष लैंगिक शोषण करण्यात आले. महिलने दुसरे लग्न केले. ही बाब माहिती होताच आरोपीने तिचे अश्लील छायाचित्र बनावट इन्स्टाग्राम खात्यावर टाकून व्हायरल केले. या प्रकरणी पीडितने अवधुतवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी ईर्शाद शेख (४५, रा. मकवाणी ले-आऊट, तायडे नगर, यवतमाळ) याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
kalyan girl sexually abused
कल्याणमधील तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तमीळनाडूतील तरूणाकडून लैंगिक अत्याचार

शहरातील एका महिलेचे २०१५ मध्ये पहिले लग्न झाले होते. मात्र सासरच्या मंडळींचा त्रास सुरू झाल्याने ती चार महिन्यानंतरच माहेर परतली. २०१६ मध्ये तिच्या पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्याबाबत प्रकरण दाखल केले. परंतू सदर महिलेला पतीसोबतच राहायचे असल्याने तिने प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्यानंतर सदर महिला प्रत्येक तारखेवर न्यायालयात जात होती. २०१७ मध्ये तिला कौटुंबिक न्यायालयात एक महिला भेटली. त्या महिलेच्या प्रकरणावर देखील न्यायालयात तारीख सुरू होती. यातून दोघींची ओळख झाली.

आणखी वाचा- खबरदार! खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले तर, कोणी दिला इशारा?

त्या महिलेने तरूणीस ईर्शाद शेख याचा क्रमांक दिला. पीडितेचा संपर्क क्रमांकही ईर्शादला दिला. त्यानंतर ईर्शादने पीडितेस फोन करून पती-पत्नीचे नाते जुळवून देतो असा विश्वास दिला. त्यानंतर ईर्शादने पीडितेसोबत सलगी वाढवून तिला आरटीओ कार्यालयाजवळ कामानिमित्त भेटायला बोलावले. त्या ठिकाणाहून बोलायचे आहे असे म्हणत भोसा परिसरातील अग्रवाल ले-आऊटजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका घराच्या बाजूच्या झोपडीत नेवून जबरस्तीने अत्याचार केला. तसेच ईर्शाद शेखने पीडितेचे अश्लील छायाचित्र काढले. हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर सात वर्षे अत्याचार केले.

दरम्यान फेब्रुवारी २०२४ मध्ये पीडितेने अन्य तरूणाशी दुसरे लग्न केले. ही बाब ईर्शाद शेख याला कळताच त्याचे पीडितेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून त्यावर तिचे अश्लील छायायित्र पोस्ट केले. ही बाब पीडितेच्या पतीच्या लक्षात येताच त्याने विचारपूस केली असता, पीडितेने सर्व घटनाक्रम सांगितला. पीडित महिलेने अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ईर्शाद शेख याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अवधुतवाडी ठाणेदार नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Story img Loader