Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory : जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी११ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही.

After Pune Guillain-Barre syndrome patients are also in Nagpur
पुण्यानंतर आता नागपुरातही ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण… मेडिकल रुग्णालयात…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

४ किलोमीटरपर्यंत आवाज

या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले

या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.

एसडीआरएफला पाचारण

जिल्हा नियंत्रण कक्ष येथे प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सकाळी अंदाजे दहा वाजता आयुध निर्माणी जवाहर नगर येथे एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावर अग्निशमन पथक पोलीस विभाग तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. सदरचे अनुषंगाने अधिकची मदत म्हणून एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे.

स्फोटातील जखमींची नावे

जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये झालेल्या स्पोटातील काही जखमींची नावे समोर आली आहेत. यातील काहींवर भंडारा येथील लक्ष रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर चंद्रशेखर गोस्वामी(वय ५९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते ज्युनियर वर्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

१- संजय राऊत(वय ५९)
२-नरेंद्र वंजारी(वय ५५)
३- राजेश बडवाईक(वय ३३)
४- सुनीलकुमार यादव (वय २४)
५-जयदीप बॅनर्जी(वय ४२)
६-मनोज मेश्राम(वय ५९)

भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटना घडली आणि संपूर्ण परिसर स्फोटामुळे हादरले. मोठे आगडोंब उडाले आहे, कारखान्यातील आग विझवण्यासाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत.

Story img Loader