बिलासपूरहून भगत की कोठीकडे जाणारी एक्स्प्रेस गोंदियाजवळ एका मालगाडीवर आदळल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना रात्री मंगळवारी १.२० मिनिटांनी गुदमा ते गोंदिया स्थानका दरम्यान घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाडी आदळल्याने धक्क्यामुळे झोपेतील प्रवासी बर्थवरून खाली पडले. काहींना हाताला, पायाला, छातीला तर काहींना डोक्याला इजा झाली. यामध्ये तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.त्याना गोंदिया येथे उपचार करण्यात आले. इतर प्रवाशांना सकाळी पावणे आठ वाजता भगत की कोठीकडे रवाना करण्यात आले.

रेल्वेडबा रुळावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेच्या चौकशी आदेश देण्यात आहेत, असे दक्षिण -पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनिंदरसिंग उप्पल यांनी सांगितले.