नागपूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ जुलै २०२२ पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. आधी १ जुलै २०२२ पर्यंतची मुदत होती. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील झोन स्तरावर हरकती व सूचना घेण्याबाबत आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नागपूर महापालिकेच्या www. nmcnagpur. gov. in या संकेतस्थळावर आणि ट्रू-व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. परंतु ही मुदत आता ३ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रू-व्होटर मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’ वरून डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास ती सुद्धा दाखल करता येईल. ‘व्होटर लिस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपले नाव टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल.

३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीनुसार एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महापालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.

सर्वसंबंधित मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची तसेच योग्य प्रभागात समाविष्ट असल्याची खात्री करून घेणे आवश्यक असून यासाठी महापालिका संकेतस्थळाचा, ट्रू वोटर ॲपचा वापर करू शकतात तसेच प्रत्यक्ष संबंधित झोन कार्यालयात प्रत्यक्ष मतदार याद्या पाहू शकतात. सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, मतदार यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.