वर्धा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज शुक्रवारपर्यंत होती. ती आता २१ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – बुलढाणा : लोंबकळणाऱ्या तारा ठरल्या प्राणघातक; मशागत करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
आता नियमित शुल्कासह २१ जून, तर विलंब शुल्कसह २२ ते २५ जून या कालावधीत अर्ज भरता येतील. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
First published on: 16-06-2023 at 13:27 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of application for 10th supplementary examination pmd 64 ssb