अमरावती : प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने बडनेरा – नाशिक – बडनेरा गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी ही गाडी १९ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार होती. ती आता ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
हेही वाचा – वर्धा : एकाने पार्टीसाठी कुटुंबास हॉटेलात नेले, तर दुसऱ्या मित्राने घर फोडले
हेही वाचा – मध्य रेल्वेचा सौर ऊर्जेवर भर, ८.११ मेगावॅट क्षमता स्थापित
गाडी क्र. ०१२११ विशेष मेमू बडनेरा येथून दि. ३० नोव्हेंबरपर्यंत दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याचदिवशी संध्याकाळी ५.४० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून दररोज रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक या ठिकाणी थांबा असेल.